महाराष्ट्र

कशेडी घाटात केमिकल टँकर कलटला

Swapnil S

पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक ६६ वरील कशेडी घाटातील भोगावच्या हद्दीत खचलेल्या घाटरस्त्यावर केमिकल वाहतूक करणारा टँकर कलंडल्याची घटना घडली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

कशेडी टॅप आणि पोलादपूर पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चालक अंकित राजेश कुमार यादव (३०) हा आपल्या ताब्यातील टँकर घेऊन लोटे ते दौंड पुणे असा प्रवास करत होता. याच प्रवासादरम्यान टँकर कशेडी घाटात भोगाव गावाच्या हद्दीतील घाटरस्त्यावर आला असता महामार्गावर असणाऱ्या दगड-मातीच्या ढिगाऱ्यावरून टँकर आडवा झाला. या टँकरमध्ये ज्वालाग्रही आणि फोम केमिकल असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

या घटनेची माहिती मिळताच कशेडी महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरिक्षक समेळ सुर्वे, पोलीस हवालदार शंकर कुंभार, रामागडे, चिकणे यांनी तातडीने धाव घेत मदतकार्य करून एकेरी वाहतूक सुरू ठेवल्याने कशेडी घाटातील वाहतूककोंडी टळली. या घाटात अपघात होण्याची ही दुसरी घटना आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाट मुंबई, पुणे व तळकोकणात ये-जा करणाऱ्या वाहनांची नेहमीच वर्दळ असते.

Jammu Kashmir Election : नंदनवनात आज अखेर मतदान; २४ जागांसाठी २१९ उमेदवार रिंगणात

One Nation, One Election ची अंमलबजावणी कधी? केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मोठे विधान

सुप्रीम कोर्टाने रोखला 'बुलडोझर न्याय'! आमच्या परवानगीशिवाय एकही पाडकाम नको; पुढील सुनावणीपर्यंत आदेश

सगेसोयरे अधिसूचनेवर सरकारनियुक्त समित्यांचे काम सुरू; कोणत्याही समाजाची फसवणूक करणार नाही - मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीची आचार संहिता कधी लागू होणार? गिरिश महाजनांनी वर्तवले भाकीत