छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात अधिकृत युती झाली असून, दोन्ही पक्षांचे जागावाटप जाहीर करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेत एकूण ६३ जागा असून, त्यापैकी २७ जागा भाजप तर २५ जागा शिवसेना लढवणार आहे. सिल्लोड विधानसभा क्षेत्रातील ११ जागांवर भाजप–शिवसेना यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होणार आहे.
सिल्लोड विधानसभा क्षेत्रात एकूण ११ जागांवर भाजप व शिवसेना यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी ही माहिती दिली असून, युतीमुळे जिल्ह्यात सत्ताबदल घडवण्याचा विश्वास दोन्ही पक्षांनी व्यक्त केला आहे.