Chhatrapati Sambhajinagar : महिला अधिकाऱ्याच्या अंगावर कार घातली; गुटखाविरोधी कारवाईदरम्यानचा धक्कादायक प्रकार  
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar : महिला अधिकाऱ्याच्या अंगावर कार घातली; गुटखाविरोधी कारवाईदरम्यानचा धक्कादायक प्रकार

अवैध गुटख्याची वाहतूक करणाऱ्या गाडीवर कारवाई करणाऱ्या पथकातील महिला अधिकाऱ्याला गोळ्या घालण्याची धमकी देत गुटखा माफियांनी स्कॉर्पिओखाली चिरडण्याचा प्रयत्न केला.

Swapnil S

सुजित ताजणे / छत्रपती संभाजीनगर

अवैध गुटख्याची वाहतूक करणाऱ्या गाडीवर कारवाई करणाऱ्या पथकातील महिला अधिकाऱ्याला गोळ्या घालण्याची धमकी देत गुटखा माफियांनी स्कॉर्पिओखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना सोमवारी रात्री एक वाजेच्या सुमारास वाळूज परिसरातील रहिमपूर गावाच्या हद्दीतील एका कारखान्यासमोर घडली.

अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा प्रमोद सुरसे यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार ८ जून रोजी रात्री एकच्या सुमारास रहिमपुर ता. गंगापुर येथील एका कारखान्याच्या समोर आयशर टेम्पो उभा होता.

सदर वाहनाची पथकाने पाहणी केली असता त्यामध्ये प्रतिबंधीत गुटख्याचे जवळपास २५ ते ३० मोठे पोते होते. त्यादरम्यान एक मोटारसायकल तसेच अन्य वाहनांमधून काही इसम वारंवार चकरा मारत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे पोलिस ठाण्यातून संरक्षण मागवले. पण त्याच दरम्यान आरोपींनी थेट कार आपल्या अंगावर घातली असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर सदर स्कॉर्पिओ गाडीमधील एक इसम आयशर टेम्पोमध्ये बसुन सदर टेम्पो भरधाव वेगाने घेवुन निघुन गेला. त्याचे मागे सदर स्कॉर्पिओ व दोन मोटार सायकल स्वारही निघुन गेले.

‘गोळ्या घाला रे…’

अधिकाऱ्यांच्या पथकावर पाळत ठेवून असलेले आरोपी मोबाईलवर कोणाशी तरी बोलत होते. थोड्याच वेळात सदर ठिकाणी काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी आली. गाडीमधील इसमांनी मोठमोठ्याने आरडाओरडा करून पथकाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी सदर गाडीमधील काहींनी यांना गोळ्या घाला रे... गोळ्या घाला म्हणून मोठमोठ्याने आरडाओरडा केला. सदर स्कॉर्पिओ चालकाने स्कॉर्पिओ गाडी पथकातील तिघांच्या अंगावर घातली. पथकातील तिघेही वेगवेगळ्या दिशेला पळाले. परंतु फिर्यादी प्रज्ञा सुरसे यांना पळता न आल्याने स्कॉर्पिओ चालकाने गाडी पुन्हा वळवून त्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने अंगावर घालण्याचा प्रयत्न केला.

CJP Protest : 'त्या' आंदोलकांची सुटका करा; सर्वोच्च न्यायालयाचे महाराष्ट्रासह ७ राज्यांना आदेश

'चुकून व्हिडिओ हटवला'; पंतप्रधान मोदींच्या फेसबुक पोस्टप्रकरणी Meta ची माफी

जपानमध्ये ७.१ तीव्रतेचा भूकंप; त्सुनामीचा इशारा, हादरवणारे Video व्हायरल

पत्नीचा जीव जात असताना मोबाईलमध्ये VIDEO शूट; पतीच्या कृत्याने पोलिसही हादरले

आरक्षणाच्या व्हायरल पोस्टवर शिल्पा शेट्टीचा संताप; म्हणाली - "माझ्या नावाने खोटी माहिती पसरवली...