गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश (संग्रहित छायाचित्र)
महाराष्ट्र

गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

NEET Protests in Maharashtra : नीट पेपरफुटी आणि ठिकठिकाणी झालेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय राज्य परीक्षा व्यवस्थेतील कथित गैरप्रकारांविरोधात राज्यात सरकारने घेतला आहे.

Swapnil S

मुंबई : नीट पेपरफुटी आणि ठिकठिकाणी झालेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय राज्य परीक्षा व्यवस्थेतील कथित गैरप्रकारांविरोधात राज्यात सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी गृह विभागाला यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

यानुसार संबंधित न्यायालयाची आवश्यक परवानगी घेऊन हे गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत. गृह विभागाला विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार, सामाजिक आणि राजकीय आंदोलनातील गुन्हे मागे घेण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीकडून हे गुन्हे मागे घेण्याबात संबंधित न्यायालयाला विनंती केली जाणार आहे.

नीट परीक्षा पेपरफुटीप्रकरणी दिल्लीत जंतरमंतरवर झालेल्या आंदोलनाचे लोण राज्यात पसरले होते. राज्यात मुंबईसह पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आदी शहरांमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला होता. या आंदोलनानंतर काही विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर अनेकांना पोलिसांकडून नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांवरील कारवाई मागे घेण्याची मागणी विविध राजकीय पक्ष आणि विद्यार्थी संघटनांकडून करण्यात येत होती.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : झोपड्या पाडणार! १४ फुटांहून अधिक उंचीच्या झोपड्यांवर होणार कारवाई; १ ऑक्टोबरपासून महापालिकेची मोहीम

Thane Ganeshotsav 2026 : 'प्रसादा'साठी व्यावसायिक गॅस सिलिंडर अनिवार्य

Mumbai : आयआयटी विद्यार्थ्यांचे आंदोलन; आणखी एक आत्महत्या, छळ करून हत्या झाल्याचा आईचा आरोप

Monsoon Update : मान्सूनचा काढता पाय; राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू, हवामान खात्याची माहिती

Maharashtra TET Paper Leak : ८,००० रुपयांसाठी बुटांमध्ये लपवून चोरल्या प्रश्नपत्रिका