ANI
महाराष्ट्र

मुख्यमंत्री शिंदे आजारी ; मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडणार ?

पुढील काही दिवस एकनाथ शिंदे कोणताही कार्यक्रम करणार नसून, या काळात ते सामान्य नागरिकांना भेटणार नसल्याचेही बोलले जात आहे

प्रतिनिधी

राज्यात सत्तांतर झाल्यापासून सतत दौऱ्यावर असलेले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थकवा जाणवू लागला आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला विश्रांतीचा सल्ला दिला. डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्याने शिंदे यांनी त्यांचे सर्व प्रशासकीय आणि राजकीय कार्यक्रम रद्द केले आहेत. त्यामुळे पुढील काही दिवस एकनाथ शिंदे कोणताही कार्यक्रम करणार नसून, या काळात ते सामान्य नागरिकांना भेटणार नसल्याचेही बोलले जात आहे. मात्र, ते मंत्रालय किंवा त्यांच्या निवासस्थानातून काम करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शिंदे यांना थकवा जाणवत असला तरी काळजी करण्याचे कारण नाही, असेही डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, डॉक्टरांनी शिंदे यांना विश्रांतीचा सल्ला दिल्याने राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत