महाराष्ट्र

‘मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२५-२६’ जाहीर; ६० फेलोंची निवड करणार

राज्याचा कारभार कशा प्रकारे चालवला जातो, याचा अनुभव राज्यातील तरुणांना घेता येणार आहे.‌ तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा प्रशासकीय प्रक्रियांमध्ये गतिमानता यावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील "मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम" २०२५-२६ जाहीर करण्यात आला आहे.

Swapnil S

मुंबई : राज्याचा कारभार कशा प्रकारे चालवला जातो, याचा अनुभव राज्यातील तरुणांना घेता येणार आहे.‌ तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा प्रशासकीय प्रक्रियांमध्ये गतिमानता यावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील "मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम" २०२५-२६ जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत ६० फेलोंची निवड करण्यात येणार आहे. फेलोशिपसाठी निवड झालेल्या तरुणांना महिना ६१ हजार रुपये छात्र वृत्ती मिळणार आहे.

फेलोंच्या निवडी संदर्भातील निकष, नियुक्तीसंदर्भातील अटी व शर्ती तसेच शैक्षणिक संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमाची रूपरेषा व अंमलबजावणी बाबत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

फेलोंच्या निवडीचे निकष

अर्जदार भारताचा नागरिक असावा. शैक्षणिक अर्हता : कोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान ६० टक्के गुण आवश्यक) असावा. किमान १ वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव आवश्यक राहील. मराठी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक राहील. हिंदी व इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक राहील. तसेच, संगणक हाताळणी आणि इंटरनेटचे ज्ञान आवश्यक राहील. उमेदवाराचे वय अर्ज सादर करावयाच्या अंतिम दिनांकास किमान २१ वर्षे व कमाल २६ वर्षे असावे.

सामान्य माणसाच्या कल्याणासाठी काम करा; अर्थमंत्री सीतारामन यांचे प्राप्तिकर विभागाला निर्देश

Nashik : भरधाव ट्रक फ्लायओव्हरवरून थेट ५० फूट खाली कोसळला; सिन्नरमधील भीषण अपघाताचा VIDEO व्हायरल

महाराष्ट्रात ८७.७९ टक्के मतदार अर्जांचे वाटप पूर्ण; १ लाखाहून अधिक BLO कडून मतदार याद्यांचे पुनरीक्षण

Mumbai : तीन वर्षांची असताना गिळलं टोपण; टीबी-दमा समजून डॉक्टरांनी ७ वर्षे केले चुकीचे उपचार, अखेर मुलीच्या फुफ्फुसाचा भाग काढला

Mumbai : पोलिसांची गाडी रोखणाऱ्या 'त्या' तरुणीची सायबर सेलमध्ये धाव; ऑनलाइन छळ, अश्लील ट्रोलिंगविरोधात तक्रार