रोहित पवार  संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

नोंदणी प्लेट्स शुल्काबाबत मुख्यमंत्र्यांची दिशाभूल; रोहित पवार यांचा दावा

वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट्सच्या (HSRP) शुल्काबाबत मुख्यंमंत्री फडणवीस यांना त्यांच्या अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती दिली असल्याचा दावा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी केला.

Swapnil S

मुंबई : वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट्सच्या (HSRP) शुल्काबाबत मुख्यंमंत्री फडणवीस यांना त्यांच्या अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती दिली असल्याचा दावा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी केला. तसेच महाराष्ट्र व गुजरात राज्यांमधील प्लेटससाठीची शुल्कात तफावत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गुजरातमध्ये दुचाकीसाठी प्लेटसाठी १६० रुपये शुल्क आकारले जात आहे, पण महाराष्ट्रात त्याचे शुल्क ४५० रुपये आहे, असा दावा पवार यांनी केला.

सरकारने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी HSRPs अनिवार्य केले आहेत.विरोधी पक्षांनी या प्लेट्ससाठी जास्त शुल्क आकारले जात असल्याचा आरोप केला आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी हा आरोप फेटाहून लावताना हे शुल्क इतर राज्यांच्या दरांशी जुळवले गेले आहेत, असे स्पष्ट केले होते.

पवार सोमवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उच्च-सुरक्षा नोंदणी प्लेट्स (HSRPs) च्या शुल्काबाबत अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती दिली आणि दावा केला की, गुजरातमधील ज्या कंपनीशी HSRP करार करण्यात आला आहे, ती कंपनी २००० कोटी रुपयांच्या घोटाळ्यात सामील आहे.

पवार यांनी पुढे सांगितले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य परिवहन बसांचा भाडेकरार, ठाणे क्रीक सौंदर्यीकरण प्रकल्प, शेती उत्पादन खरेदी, आणि बीएमसीमधील १,४०० कोटी रुपयांच्या निविदांवर स्थगिती का घातली, याचे स्पष्टीकरण द्यावे.

मुंबईतील हॉटेल्स, बार, बेकऱ्या FDA च्या रडारवर; ख्रिसमस-नववर्षाच्या तोंडावर तपासणी मोहीम

मुंबईच्या हवा गुणवत्तेसाठी 'मानस'ची निर्मिती; IIT Kanpur च्या सहकार्याने BMC राबवणार प्रकल्प

Mumbai : 'कूपर'मध्ये बेडवरून रुग्ण पडण्याच्या घटनांत वाढ; नातेवाईकांकडून सुरक्षेची मागणी

Thane RTO : वाहनधारकांनो तुम्ही HSRP नंबर प्लेट बसवली? 'डेडलाईन' जारी; त्वरित ऑनलाइन अर्जाद्वारे अपॉइंटमेंट घेण्याचे आवाहन

"सरकारचे प्राधान्य शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला नाही तर...; सुप्रिया सुळेंची सत्ताधाऱ्यांवर टीका