महाराष्ट्र

Chinchwad By Election : चिंचवड पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून नाना काटेंना उमेदवारी; मात्र, राहुल कलाटेंची नाराजी

चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये (Chinchwad By Election) राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) नाना काटेंना उमेदवारी जायीर करण्यात आल्यानंतर राहुल कलाटे करणार बंडखोरी

प्रतिनिधी

चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये (Chinchwad By Election) आता महाविकास आघाडीकडून (MahaVikasAaghadi) आपला उमेदवार जाहीर केला आहे. राष्ट्रवादीने (NCP) नाना काटे (Nana Kate) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली. तसेच, विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत नाना काटे उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, पक्षाच्या या निर्णयावर राहुल कलाटे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. सुरुवातीला उमेदवारीसाठी राहुल कलाटे यांचे नाव आघाडीवर असल्याचे सांगितले जात होते. मात्र, ऐनवेळी नाना काटे यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली.

कसबा पेठ नंतर आता चिंचवड पोटनिवणुकीसाठी आता महाविकास आघाडीने आपला उमेदवार जाहीर केला. महाविकास आघाडीकडून कसबा पेठची जागा ही काँग्रेसला तर चिंचवडची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली आहे. पण, चिंचवडमध्ये नाना काटेंना उमेदवारी दिल्याने राहुल कलाटे यांनी नाराजी व्यक्त केली. राहुल कलाटे हे बंडखोरीच्या मार्गावर असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, ते अपेक्षा म्हणून निवडणुकीसाठी उभे राहू शकतात, अशी शक्यतादेखील व्यक्त करण्यात येत आहे.

राहुल कलाटे म्हणाले की, "महाविकास आघाडीकडे मी प्रमुख दावेदार होतो, त्यामुळे मी मी उमेदवारी मागत होतो. परंतु आघाडीने माझी उमेदवारी नाकारली. गेल्या वेळेस मला १ लाखाहूनही अधिक मते मिळाली होती. वर्ष २०१४ आणि वर्ष २०१९ला मला असंख्य मते देऊन जनतेने माझ्यावरचा विश्वास दाखवला होता. मला त्याबाबत आत्मविश्वास होता. परंतु काय झाले ते वरिष्ठचा सांगतील. लक्ष्मण जगताप यांच्यामुळे निवडणूक बिनविरोध होईल असे वाटत होते. परंतु आघाडीने निवडणूक लढवणार असल्याचे ठरवल्यावर मी इच्छुक म्हणून उमेदवारी मागितली होती." असे म्हणत त्यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली.

मोठी बातमी! अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांचा राजीनामा

"आपण करून दाखवलं!"; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अभिजीत दिपकेंची पहिली प्रतिक्रिया

'तिरंगा मार्च'च्या एक दिवस आधी राज ठाकरेंची पोस्ट; म्हणाले - 'कुठल्याही पक्षाचा झेंडा, नेत्यांच्या घोषणा नको...

CJP Protest : अभिजीत दिपकेंना टायफॉइडची लागण; VIDEO शेअर करत म्हणाले- 'आंदोलन थांबणार नाही'

Ashadhi Ekadashi 2026 : विठ्ठलनामात रंगली पंढरी; पाहा खास क्षणचित्रे