महाराष्ट्र

शिंदेसेनेच्या मंत्र्याचा आणखी एक कॅशबॉम्ब! शेकापच्या चित्रलेखा पाटलांकडून भरत गोगावलेंचा नोटांच्या बंडलासोबतचा Video समोर

नागपूरमधील हिवाळी अधिवेशन कॅशबॉम्ब प्रकरणाने चांगलेच गाजत आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कॅशबॉम्बनंतर आता मंत्री भरत गोगावले यांचा नोटांच्या बंडलासोबतचा व्हिडीओ शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी समोर आणला आहे. त्यामुळे ऐन अधिवेशनाच्या काळात शिंदे गटाला कोंडीत पकडण्याची नामी संधी विरोधकांना मिळाली आहे.

Swapnil S

मुंबई : नागपूरमधील हिवाळी अधिवेशन कॅशबॉम्ब प्रकरणाने चांगलेच गाजत आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कॅशबॉम्बनंतर आता मंत्री भरत गोगावले यांचा नोटांच्या बंडलासोबतचा व्हिडीओ शेतकरी कामगार पक्षाच्या (शेकाप) प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी समोर आणला आहे. त्यामुळे ऐन अधिवेशनाच्या काळात शिंदे गटाला कोंडीत पकडण्याची नामी संधी विरोधकांना मिळाली आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांचा नोटांसह असलेला व्हिडिओ जाहीर करून खळबळ उडवून दिली होती. त्याचा दुसरा अंक बुधवारी शेकापच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी समोर आणला. त्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगवले मोठ्या रकमेसह दिसत आहेत. मंत्री गोगावले यांच्या समोर मोठ्या प्रमाणात नोटांचे बंडल असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. ऐन अधिवेशन काळात हा व्हिडिओ समोर आल्याने येत्या काळात भरत गोगावले यांच्यासमोरील अडचणी वाढणार आहेत.

चित्रलेखा पाटील यांनी मंत्री गोगावले यांची चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी केली आहे. त्यानंतर चित्रलेखा पाटील यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्यावरही गंभीर आरोप केलेत. “केंद्र आणि राज्य शासनाने सीबीआय, ईडी आणि अँटी करप्शन ब्युरोकडून महेंद्र दळवींच्या कॅशबॉम्ब प्रकरणाची सखोल चौकशी करावी,” अशी मागणी चित्रलेखा यांनी केली आहे. “सर्वाधिक गुन्हे असलेले हे आमदार आहेत. गेल्या वेळी त्यांच्या पत्नीचा व्हिडीओ व्हायरल झाला, त्यांनी ‘५० खोरे म्हटलं तर कॅशबॉम्बवाल्यांची बायको माझ्यावर धावत आली. आता त्यांच्या पतीचा व्हिडीओ व्हायरल झाला,” अशी टीकाही चित्रलेखा पाटील यांनी महेंद्र दळवी यांच्यावर केली.

गोगावले यांनी फेटाळले आरोप

मंत्री भरत गोगावले यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी गोगावले यांनी केली असून कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची आपली तयारी आहे. विरोधकांकडून केवळ आरोप करून नाहक बदनामी केली जात असल्याचे गोगावले यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना स्पष्ट केले.

महापालिका निवडणुकीत महायुती एकत्रच; एकनाथ शिंदे, रवींद्र चव्हाण यांच्यात सूरसंगम

जनगणनेबरोबरच जातगणना होणार; ११,७१८ कोटींच्या खर्चाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

तपोवनातील वृक्षतोडीला हरित लवादाची स्थगिती; संयुक्त समिती पाहणी करणार

पर्यावरणाच्या मुळावर विकास!

जात हरेल, प्रेम जिंकेल