महाराष्ट्र

खोदलेल्या रस्त्यांवर झोपून नागरिकांचे आंदोलन

Swapnil S

उल्हासनगर : उल्हासनगरच्या भाटिया चौकात खोदलेल्या रस्त्यावर झोपून आणि ठिय्या मांडून पालिका प्रशासन आणि ठेकेदाराविरोधात नागरिकांनी तीव्र आंदोलन छेडले. यावेळी महापालिकेच्या विरोधात नागरिकांनी घोषणाबाजी केली.

शहरात एकाच वेळी सगळीकडे भुयारी गटाराच्या कामांसाठी रस्ते खोदण्यात आलेत. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून हे रस्ते खोदल्यानंतर ते रस्ते सुस्थितीत करण्याची गरज होती; मात्र काम झाल्यावर केवळ माती टाकून हे रस्ते तसेच ठेवण्यात आलेत. त्यामुळे धुळीचे साम्राज्य निर्माण होऊन नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास होतो आहे. विशेषत: या रस्त्यावरून वाहने गेल्यानंतर आजूबाजूच्या परिसरात असलेल्या नागरिकांच्या घरात धुळीचे साम्राज्य निर्माण होत आहे. तसेच या धुळीमुळे वृद्ध आणि लहान मुलांना श्वसनाचे विकार जडू लागलेत. शिवाय अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

“नेहमीप्रमाणे त्यांचं रडगाणं सुरु झालंय...”, उद्धव ठाकरेंच्या आरोपावर देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर!

"सकाळी पाच-सहा वाजले, तरी त्यांना..." उद्धव ठाकरे निवडणूक आयोगावर संतापले

सिगारेट पिऊन चालली होती थट्टा मस्करी, टवाळखोर तरुणांनी मित्रालाच केली बेदम मारहाण

"४ जूनला सर्वजण मिळून जल्लोष करू," चंद्रशेखर बावनकुळे यांचं कार्यकर्त्यांना भावनिक पत्र

EVM मशिनला हार घालणं भोवणार? शांतिगिरी महाराजांवर गुन्हा दाखल