महाराष्ट्र

कालव्याची दुरुस्ती, अस्तरीकरणाचे काम पूर्ण करा ; छगन भुजबळ यांचे आदेश

Swapnil S

लासलगाव/वार्ताहर - येवला तालुक्यातील सिंचनाच्या वाढीसाठी मांजरपाडा प्रकल्प साकारला आहे. या प्रकल्पाद्वारे येणारे पाणी पूर्ण क्षमतेने डोंगरगावपर्यंत पोहचण्यासाठी पुणेगाव व डोंगरगाव कालव्याचे अस्तरीकरण करण्यात येत आहे. हे काम येणाऱ्या पावसाळ्याच्या आत पूर्ण करण्यात यावे, असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सबंधित अधिकाऱ्यांना दिले.

भुजबळ यांच्या प्रयत्नांतून पुणेगाव डोंगरगाव कालव्याच्या अस्तरीकरण कामास २४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आज भुजबळ यांनी अंगुलगांव, न्याहारखेडे खु., नगरसुल येथे दरसवाडी डोंगरगांव पोहोच कालव्याची दुरुस्ती व अस्तरीकरण कामाची पाहणी केली. पुणेगाव ते दरसवाडी कालवा विस्तारीकरण, अस्तरीकरण कामात एकूण ६३ किमीसाठी ९६ कोटी इतक्या निधीची तरतूद आहे. तर दरसवाडी ते डोंगरगाव एकूण ८७ किमी अंतर विस्तारीकरण, अस्तरीकरण करण्यासाठी १४६ कोटी ८३ लक्ष रुपये मंजूर आहेत. पुणेगाव ते दरसवाडी या ९६ कोटी च्या कामात अस्तरीकरण, काँक्रीटीकण, पुल , कालव्याखालून जाणारे पाणी यासाठी एचपीडी सुविधा, नदीवरील पूल, कालव्यास गरजेनुसार संरक्षक भिंत, गेट आदी कामांचा समावेश आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त