महाराष्ट्र

शिवसृष्टी प्रकल्पाची कामे गतीने पूर्ण करा -छगन भुजबळ

Swapnil S

नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या सहकाऱ्यांचा इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहचवणारा शिवसृष्टी प्रकल्प अतिशय महत्त्वाचा आहे. हा प्रकल्प वेळेत साकारण्यासाठी त्याच्या कामांना प्राधान्य देवून गतीने कामे पूर्ण करावीत, अशा सूचना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या.

येवला येथे पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टी प्रकल्पाची पाहणी मंत्री भुजबळ यांनी केली. त्यावेळी संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांना सूचना दिल्या. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता सागर चौधरी, आर्किटेक्चर सारंग पाटील यांच्यासह कंत्राटदार उपस्थित होते.

मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, शिवसृष्टी प्रकल्प बांधकाम करताना व प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर देखील याठिकाणी पाण्याची कमतरता भासणार नाही, याकरिता योग्य नियोजन करण्यात यावे. प्रकल्पाची कामे वेळेत करण्यासाठी आवश्यक निधीची मागणी करून कामांना वेग देण्याचे निर्देश ही यावेळी मंत्री भुजबळ यांनी संबंधिताना दिले.

तत्पूर्वी, मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा निधीतून स्वामी मुक्तानंद शाळेच्या आवारात बांधण्यात आलेल्या ग्रीन जिमचेही उद्घाटन करण्यात आले.

'अशी' आहेत प्रस्तावित कामे

श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा १० फूट उंचीचा सिंहासनाधिष्ठित मेघडंबरीसह पुतळा

महाराजांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना व महाराजांचे सेनापती यांचे भित्तीचित्रांच्या माध्यमातून प्रदर्शन

माहिती केंद्र व कार्यालय

शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन

ऑडिओ व्हिज्युअल हॉल

पुस्तक व साहित्य विक्री केंद्र

स्वच्छतागृह, उपहारगृह, गार्डन व वाहनतळ

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त