महाराष्ट्र

वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांचीच! राज्य सरकारचा अधिवेशनात दावा; १९ जुलैला साताऱ्यात प्रदर्शनात बघता येणार

Swapnil S

मुंबई : ब्रिटन सरकारशी चर्चा करुन अखेर वाघनखं महाराष्ट्रात आणली आहेत. १९ जुलैला साताऱ्यातील शासकीय म्युझियम मध्ये प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात आणण्यात येणारी वाघनखं ही छत्रपती शिवाजी महाराजांचीच आहे, असे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधान सभेत गुरुवारी निवेदन सादर केले.

ब्रिटन मध्ये असलेली वाघनखं छत्रपती शिवाजी महाराज यांची नसून ती साताऱ्यातच आहे, असे म्हणणे काही इतिहासकारांनी मांडले होते. यावर मुनगंटीवार यांनी विधान सभेत निवेदन सादर केले.

वाघनखं भारतात आणण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च झाला, असे काहींनी म्हटले आहे. मात्र प्रत्यक्षात अधिवेशनाचा एक दिवसांचा खर्च त्याहीपेक्षा कमी म्हणजे वाघनखं राज्यात आणण्यासाठी १४ लाख ८ हजार रुपये खर्च झाल्याचे त्यांनी निवेदन सादर करताना सांगितले.

शिवाजी महाराज आपला आत्मा आहे. अनेकांनी ही वाघ नखं मिळावी यासाठी पत्रव्यवहार केला. त्यानुसार आपण भारत आणि ब्रिटन यांच्यात एक सामंजस्य करार केला. त्यानंतर ही वाघ नखं आपल्याकडे तीन वर्ष राहील असा निर्णय झाला आहे, असे ही ते म्हणाले.

अफजलखान वधासाठी वापरल्याचा स्पष्ट उल्लेख

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, “अनेक शिवभक्तांनी छत्रपतीं शिवाजी महाराजांची वाघनखे लंडनमध्ये असून ती भारतात आणावीत अशी मागणी केली. त्यासंदर्भातील काही कागदपत्रे अनेक शिवभक्तांनी आमच्याकडे आणून दिली, पाठवली. व्हिक्टोरीया अँड अल्बर्ट संग्रहालयाकडे सदर वाघनखे दिली जाण्यापूर्वी लंडनमध्ये १८७५ व १८९६ या वर्षी झालेल्या एका प्रदर्शनात ही वाघनखे प्रदर्शित झाली होती. लंडनमधील संबंधित संग्रहालयात अनेक वाघनखे आहेत हे खरे असले तरी केवळ या विशिष्ट वाघनखांनाच १८२५ मध्ये विशेष पेटीचे आवरण बनविण्यात आले आहे आणि त्यावर ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखान वधासाठी वापरल्याचा स्पष्ट उल्लेख आहे अशी माहितीही त्यांनी दिली.

Mumbai : आर्थिक कोंडी फोडण्यासाठी ‘बेस्ट’ आयडिया! आता CNG विकणार; २७ डेपोंत प्रकल्प राबवणार

कोल्हापूर -पुणे 'वंदे भारत' आजपासून; आठवड्यातून ३ दिवस धावणार, बघा वेळापत्रक

‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी भेदभाव; दोन वकिलांची मुंबई पोलिसांकडे तक्रार

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवठ्यात निवडणुका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संकेत, महायुतीचे जागावाटप आठवडाभरात पूर्ण!

गणरायाच्या विसर्जन सोहळ्यासाठी BMC सज्ज; ६९ नैसर्गिक स्थळांसह, २०४ कृत्रिम विसर्जनस्थळांची व्यवस्था