महाराष्ट्र

सायबर सुरक्षा होणार अधिक भक्कम; राज्य सरकार एआय टूल खरेदी करणार

सायबर गुन्हे रोखण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. त्यात आता सायबर सुरक्षा अधिक भक्कम करण्यासाठी आया एआय टूल खरेदी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी राज्य सरकार तब्बल ८९ कोटी ७८ लाख ५० हजार रुपये खर्च करणार आहे. याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

Swapnil S

मुंबई : सायबर गुन्हे रोखण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. त्यात आता सायबर सुरक्षा अधिक भक्कम करण्यासाठी आया एआय टूल खरेदी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी राज्य सरकार तब्बल ८९ कोटी ७८ लाख ५० हजार रुपये खर्च करणार आहे. याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

सायबर गुन्हे रोखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. नव्याने विकसित होत असलेल्या सायबर आव्हानांवर मात करण्यासाठी महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पाच्या पायाभूत सुविधांचे मजबुतीकरण व सुरक्षितता सुनिश्चित आणि आयटी प्रणालीचे प्रभावीपणे व्यवस्थापन व देखरेख करण्यासाठी उच्चतम आधुनिक कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) आधारित उपाय करणे गरजेचे आहे. ए आय - आधारित टूल महाराष्ट्र सायबर विभागातील सर्व - आधारित प्रणालीची कार्यक्षमता सुधारण्यात व वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. विशेषतः महाराष्ट्र सायबर

सुरक्षा प्रकल्पाच्या सध्या सुरू असलेल्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने हे टूल सातत्याने प्रकल्पाचे निरीक्षण करणार असून अकार्यक्षमता, त्रुटी शोधून अंदाज लावेल आणि त्यांना पूर्णपणे दुरुस्त करणार आहे. यामुळे सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यात यश येणार आहे.

Maratha Reservation : शिंदे समितीची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा; मराठा आरक्षणावर निर्णायक टप्पा?

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती

आंदोलनामुळे हॉटेल, दुकाने बंद; आंदोलकांची झाली गैरसोय, सोबत १५ दिवसांची शिदोरी...