ANI
महाराष्ट्र

‘शक्ती’ चक्रीवादळाचा महाराष्ट्राला धोका नाही; भारतीय हवामान खात्याचा दिलासा

अरबी समुद्रावरून सरकत असलेले तीव्र चक्रीवादळ ‘शक्ती’चा मुंबई आणि महाराष्ट्रावर रविवारी संध्याकाळपर्यंत कोणताही थेट परिणाम झालेला नाही, असे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले. मात्र, राज्यात मान्सूनचा प्रभाव कायम असून पुढील काही दिवस मध्यम पावसाची शक्यता आहे.

Swapnil S

देवश्री भुजबळ/मुंबई

अरबी समुद्रावरून सरकत असलेले तीव्र चक्रीवादळ ‘शक्ती’चा मुंबई आणि महाराष्ट्रावर रविवारी संध्याकाळपर्यंत कोणताही थेट परिणाम झालेला नाही, असे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले. मात्र, राज्यात मान्सूनचा प्रभाव कायम असून पुढील काही दिवस मध्यम पावसाची शक्यता आहे.

हवामान खात्याच्या पाच दिवसांच्या अंदाजानुसार, मुंबईत हलका ते मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी मेघगर्जनेसह सरींची शक्यता आहे. तर ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांना मंगळवारी, ७ ऑक्टोबर रोजी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. या दिवशी काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, मध्यम पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, शहराचे कमाल तापमान सुमारे ३० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील.

राज्यातील मान्सून माघारी जाण्यापूर्वी ६ आणि ७ ऑक्टोबर रोजी आणखी एक पावसाची फेरी येईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात मान्सूनची अधिकृत माघार सामान्यतः १० ऑक्टोबरला होते, मात्र यंदा ती काहीशी उशिरा होण्याची शक्यता आहे.

चक्रीवादळ ‘शक्ती’चा महाराष्ट्रावर परिणाम होणार का, या प्रश्नावर ‘आयएमडी’ मुंबईच्या वैज्ञानिक सुषमा नायर यांनी रविवारी स्पष्ट केले की, “मुंबई आणि महाराष्ट्रासाठी या चक्रीवादळाचा कोणताही धोका नाही.” ‘आयएमडी’ने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, चक्रीवादळ ‘शक्ती’ उत्तर-पश्चिम आणि पश्चिम-मध्य अरबी समुद्रावर पश्चिम-दक्षिण दिशेने सुमारे १८ किमी प्रतितास वेगाने सरकत असून, रविवारी (५ ऑक्टोबर) सकाळी ८:३० वाजता ते ओमानमधील रास अल हद्दच्या आग्नेयेस २२० किमी, मसीराहच्या पूर्वेस २५० किमी, कराचीच्या नैऋत्येस ७५० किमी, नलियाच्या पश्चिम-नैऋत्येस ८२० किमी आणि द्वारकेच्या पश्चिमेस ८२० किमी अंतरावर केंद्रित होते.

''रोहित पवारांना फोटो कुठून मिळाला?'' रमी प्रकरणी माणिकराव कोकाटेंची न्यायालयात धाव; माफीची मागणी

भिक्षागृहातील भिक्षुकांच्या मानधनात वाढ; आता दररोज ५ ऐवजी ४० रुपये मिळणार, ऑक्टोबरपासून मिळणार वाढीव मानधन

उल्हासनगर : खोट्या कागदपत्रांवर मिळवला GST परतावा; राज्यकर विभागाने उघडकीस आणला महाघोटाळा!

न्यायिक चौकशीच्या आदेशापर्यंत तुरुंगात राहणार; पर्यावरण नेते सोनम वांगचूक यांचा निर्धार

प्रस्ताव पाठवा, मदत देऊ; पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आश्वासन