महाराष्ट्र

लोकमान्य टिळकांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचे निधन

‘केसरी’चे विश्वस्त-संपादक, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती व लोकमान्य टिळक यांनी स्थापन केलेल्या अनेक संस्थांचे आधारवड डॉ. दीपक जयंतराव टिळक यांचे अल्पशा आजाराने बुधवारी (दि. १६)पहाटे निधन झाले.

Swapnil S

पुणे: ‘केसरी’चे विश्वस्त-संपादक, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती व लोकमान्य टिळक यांनी स्थापन केलेल्या अनेक संस्थांचे आधारवड डॉ. दीपक जयंतराव टिळक यांचे अल्पशा आजाराने बुधवारी (दि. १६) पहाटे निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात चिरंजीव डॉ. रोहित टिळक, कन्या डॉ. गीताली टिळक, स्नुषा डॉ. प्रणति रोहित टिळक, जामात, नातवंडे असा परिवार आहे. डॉ. टिळक हे मागील काही दिवसांपासून आजारी होते. मागील आठवड्यात त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर ते घरी परतले होते. काल पहाटे त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

सकाळी ८ ते ११ या वेळेत त्यांचे पार्थिव केसरीवाड्यातील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर मुकुंदनगर येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठात पार्थिव ठेवण्यात आले. त्यावेळी दर्शनासाठी मोठी रीघ लागली होती. दुपारी १२.३० च्या सुमारास डॉ. टिळक यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह पत्रकारिता, शैक्षणिक, राजकीय, यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

घटनेतील तरतुदींचे स्पष्टीकरण करणार, सर्वोच्च न्यायालयाची माहिती; राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकावर कालावधीचे बंधन

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता