महाराष्ट्र

रायगड; 1725 कोटी रुपयांचे तब्बल 22 टन हेरॉईन जप्त, दिल्ली पोलिसांनी केली मोठी कारवाई

रायगडच्या उरण तालुक्यातील न्हावाशेवा बंदरातून अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत

वृत्तसंस्था

रायगडच्या उरण तालुक्यातील न्हावाशेवा बंदरातून अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. 1725 कोटी रुपयांचे तब्बल 22 टन हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली आहे. या सर्व वस्तू एका कंटेनरमधून जप्त करण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानच्या दोन नागरिकांना अटक केली होती.

तपासादरम्यान या दोघांकडून अनेक खुलासे झाले आहेत. त्याआधारे पोलिसांनी 1200 कोटींचे ड्रग्ज जप्त केले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता मुंबई बंदरात एक कंटेनर असल्याचे समोर आले. या माहितीच्या आधारे दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दोन्ही आरोपींसह न्हावाशेवा बंदरात दाखल होऊन कारवाई करत तब्बल 22 टन हेरॉईन जप्त केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारमूल्यानुसार हेरॉईनची एकूण किंमत १७२५ कोटी आहे. अंमली पदार्थ देशात आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केले जात असल्याचेही स्पष्ट झाले आहे. दिल्ली पोलिसांचे डीसीपी प्रमोद कुशवाह यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

तरुण तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; याचिका फेटाळली, दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

Mumbai : माझगावच्या गणपती मिरवणुकीवर अंडी फेकल्याचा आरोप; २२ वर्षीय तरुणाला अटक

Mumbai : बीकेसीतील 'एमसीए'च्या ५ उपाहारगृहांचे परवाने रद्द; FDA चा दणका; कारवाई सुरूच

Mumbai : चर्चगेट मेट्रो स्थानकातील लिफ्ट अचानक बंद; ६ प्रवासी अडकले

गर्लफ्रेंडने कारवर उमटवले ३४०० 'किस'; VIDEO व्हायरल होताच पोलिसांची कारवाई, तरुणाला ५,५०० रुपयांचा दंड