उकाड्यामुळे शाळांचे वेळापत्रक बदलण्याची मागणी; दुपारच्या सत्रात शाळा नको  'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

उकाड्यामुळे शाळांचे वेळापत्रक बदलण्याची मागणी; दुपारच्या सत्रात शाळा नको

जून महिन्याचे १५ दिवस उलटून गेल्यानंतरही पावसाने राज्यातील बहुतांश भागाकडे पाठ फिरवली आहे. यामुळे ऊन आणि उकाड्याने विद्यार्थी आणि पालक हैराण झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थी व पालकांकडून शाळांचे वेळापत्रक बदलण्याची मागणी होऊ लागली आहे.

Swapnil S

मुंबई : जून महिन्याचे १५ दिवस उलटून गेल्यानंतरही पावसाने राज्यातील बहुतांश भागाकडे पाठ फिरवली आहे. यामुळे ऊन आणि उकाड्याने विद्यार्थी आणि पालक हैराण झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थी व पालकांकडून शाळांचे वेळापत्रक बदलण्याची मागणी होऊ लागली आहे. वाढत्या तापमानामुळे पुढील १५ दिवस दुपारच्या सत्रातील शाळा, सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी विविध शिक्षक संघटनांनी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

विदर्भ वगळता राज्यभरातील शाळा १५ जूनपासून सुरू झाल्या आहेत. मात्र दुपारच्या सत्रात शाळांमध्ये जाणारे विद्यार्थी उन्हाच्या झळा आणि उकाड्याने हैराण होऊ लागले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. विशेषतः ग्रामीण भागांतील अनेक शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची कमतरता, अपुरा वीजपुरवठा तसेच लोखंडी पत्र्यांच्या वर्गखोल्यांमुळे विद्यार्थ्यांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे.

विद्यार्थ्यांचे आरोग्य, सुरक्षितता लक्षात घेता शाळांच्या वेळापत्रकात तात्पुरते बदल करण्याची मागणी पालकांकडून होत आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत सकाळच्या सत्राचा पर्याय स्वीकारावा, अशी मागणीही होत आहे.

CJP Protest : रांका, दास यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी; तिहारमध्ये रवानगी, दिपके आक्रमक, म्हणाले - "हिंमत असेल तर...

पत्नीशी वाद टाळण्यासाठी बाल्कनीतून पळण्याचा प्रयत्न जीवावर; २१ व्या मजल्यावरून पडून पतीचा मृत्यू

Bihar Boat Tragedy : गंगा नदीत प्रवाशांनी भरलेली नाव उलटली; एकाच कुटुंबातील १३ मुलांचा करुण अंत, VIDEO

Ahmedabad : चनिया चोली घालून महिला पोलिसांचा गरबा; स्त्रियांच्या सुरक्षेसाठी 'तिच्या टीम'ची अनोखी शक्कल

Nalasopara Fire : नालासोपाऱ्यात १४ मजली इमारतीला भीषण आग; दोन महिलांचा मृत्यू, २५ रहिवाशांची सुटका, VIDEO