शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. यानंतर राज्यात मोठं वादंग उठलं. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात देखील याचे पडसाद उमटले. यानंतर काँग्रेस पक्षाकडून राज्यभर आंदोलन सुरु झालं. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संभाजी भिडेंना अटक करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. आता काँग्रेस नेत्या आणि राज्याच्या माजी महिला आणि बालविकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी भिडेंबद्दल मोठा दावा केला आहे. संभाजी भिडे हे अफजल खानाच्या वकिलांचे वंशज असल्याचा मोठा दावा त्यांनी केला आहे.
संभाजी भिडे यांच्याविषयी बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या की, हा माणूस इतका घाणेरडा आहे.भिडे ज्या भागातून येतात तिथे फोन लावला आणि हा माणूस कसा आहे असं विचारलं. तेव्हा संभाजी भिडे अफजल खानाचे वकिल श्रकृष्ण कुलकर्णी यांचे वंशज आहेत.असं स्थानिक लोक सांगततात. म्हणजे हे वंशज कोणाचे, नाव काय ठेवतात, बोलतात काय, दुसरकडे सरकार त्यांनी खुलेपणाने फिरू देत आहे, असं यशोमती ठाकून म्हणाल्या आहेत.
यावेळी यशोमती ठाकूर यांनी संभाजी भिडे यांच्यावर अदखपात्र गुन्हा दाखल करण्यची मागणी केली.तसंच "देशाच्या इतिहासाची तोडमोड करण्याचा अधिकार कोणालाही नाही.हे असंच करत राहीले आणि समाजात अशांतात पसरवली, १५ ऑगस्टच्या काळात काही अनर्थ झाला तर याला जबाबदार गृहखातं, पोलीस आणि नालायक संभाजी भिडे असेल", असा इशारा देखील त्यांनी दिला.