महाराष्ट्र

"गिरीशभाऊ तर आमच्यासाठी..." आठवणींना उजाळा देताना उपमुख्यमंत्री फडणवीस झाले भावुक

भाजप खासदार गिरीश बापट यांचे आज निधन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा

प्रतिनिधी

आज भाजप खासदार गिरीश बापट यांचे दुर्धर आजाराने निधन झाले. त्यांच्यावर सर्वपक्षीय नेत्यांनी शोक व्यक्त करत आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात जाऊन त्यांचे अंतदर्शन घेतले. यावेळी प्रतिक्रिया देताना ते भावुकही झालेलं दिसले. ते म्हणाले की, "गिरीश बापट हे पुण्याच्या खाणीतील अनमोल रत्न होते. गिरीशभाऊ आणि माझा अतिशय जवळचा संबंध होता. तब्बल १५ वर्षे आम्ही मॅजेस्टिक आमदार निवासामध्ये एकत्र राहिलो होते. तेव्हा ते आमच्यासाठी जेवणही तयार करायचे. आम्हाला जेवायला घालायचे," असे म्हणताना त्यांना गहिवरून आले.

"गिरीशभाऊंकडे माणसे जपण्याची कला होती. अगदी चपराशीपासून ते मंत्र्यापर्यंत प्रत्येकाशी त्यांची मैत्री होती. सभागृहामध्ये त्यांचे भाषण किंवा मंत्री म्हणून उत्तर हे इतके चपखलपणे द्यायचे की विरोधक अक्षरश: शांत बसत होते. कोणालाही न दुखवता शालजोडीतले शब्द वापरून आपला मुद्दा पटवून देण्याची गिरीश भाऊंची हातोटी होती." असे म्हणत त्यांनी आठवणींना उजाळा दिला. तसेच, "पुण्याच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी केलेले काम पुणे कधीच विसरू शकणार नाही. आमच्याबरोबर संसदीय कार्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले तेव्हा मी मुख्यमंत्री म्हणून चिंतामुक्त असायचो." असे त्यांनी गिरीश बापट यांना आदरांजली वाहिली.

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

आज विजयी मेळावा; उद्धव-राज ठाकरे वरळीत एकाच मंचावर येणार

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त

मथुरेची शाही ईदगाह मशीद वादग्रस्त संरचना नाही; अलाहाबाद उच्च न्यायालयाने हिंदू पक्षाची याचिका फेटाळली

मुद्रांक शुल्कातील निधी थेट देणार; स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी नवीन कार्यपद्धती - बावनकुळे