महाराष्ट्र

फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी देणारा अटकेत; व्हिडिओ झाला होता व्हायरल

साताऱ्यातून पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याला ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Swapnil S

मुंबई : उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी देणारा मुख्य आरोपी किंचक नवले यास पोलिसांनी सातारा येथून अटक केली. नवले याला ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

नवलेने एका व्हिडीओच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर समाजात तेढ निर्माण होईल, अशा भाषेत टीका केली होती. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. याप्रकरणी किंचक नवले याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात त्याने देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

राज्यात ९८ टक्के पाऊस पडणार! ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांचा अंदाज

अपात्र बहिणींकडून पैसे वसूल करणार नाही! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण, १४ हजार पुरुषांकडून पैसे वसूल करणार

यंदाची फेरपरीक्षा संगणकावर नाही; नीटप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी 'कॉकरोच'ची आंदोलनाची हाक; दिपके ६ जूनला भारतात परतणार

'खिसेकापूंपासून सावधान' राहुल गांधी यांचा सरकारवर निशाणा