संग्रहित छायाचित्र 
महाराष्ट्र

"उद्धव ठाकरेंना १९९९मध्ये मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पडू लागली होती म्हणून...", देवेंद्र फडणवीस यांचा दावा

"युतीचे सरकार आले असताना देखील मी मुख्यमंत्री झालो नाही, याचा मला धक्का बसला होता", असेही फडणवीस म्हणाले.

Aprna Gotpagar

मुंबई : उद्धव ठाकरे यांना १९९९मध्ये मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पडून लागली होती, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तपत्रला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. यात फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात माझा महत्त्वाचा वाटा आहे, असेही फडणवीसांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, "बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा असल्यामुळे आम्ही काही बोलत नव्हतो. बाळासाहेब ठाकरेंविषयीच्या आदरापोटी आम्ही काही गोष्ट समजून सुद्धा काही बोललो नाही. हे खरे आहे की, उद्धव ठाकरेंना तर, युतीची सत्ता आल्यानंतर १९९९पासून मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पडू लागली होती. १९९९मध्ये उद्धव ठाकरेंनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले", असा गौप्यस्फोट त्यांनी केला.

"अजित पवार महायुतीत सामील झाल्यापासून त्यांच्यावर टीका केली जाते. परंतु, शरद पवारांनी स्वत: पाच चिन्हांवर निवडणूक लढवली आणि पाचही वेळेला चिन्ह बदलली. परंतु, त्यांना यश मिळाले नाही. यानंतरही पवारांनी नवी भूमिका, नवा प्रयत्न केला. पण, निकाल त्यांच्या अपक्षेप्रमाणे लागला नाही, हे त्यांना कळाले. यानंतर शरद पवारांनी काँग्रेसमध्ये छोट्या पक्ष विलिनीकरणाची चर्चा सुरू केली, त्यांचे हे कायम असेच असते", असा टोला फडणवीस यांनी लगावला.

मी विरोधी पक्षनेता...

फडणवीस पुढे म्हणाले, "राज्यात युतीचे सरकार आले असताना देखील मी मुख्यमंत्री झालो नाही, याचा मला खूप मोठा धक्का बसला होता. यानंतर मी विरोधी पक्षनेता या नात्याने काम करू लागतो. हे काम करत असताना संकटे आणि आव्हाने येत होती. पुढे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला, त्यात माझा महत्त्वाचा सहभाग होता आणि पक्षकार्यकर्ता म्हणून मी ते केले, असे फडणवीसांनी सांगितले.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी