नदीजोड प्रकल्पामुळे दुष्काळ संपणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन; ‘गोदा ते नर्मदा' जलयात्रेचा शुभारंभ 
महाराष्ट्र

नदीजोड प्रकल्पामुळे दुष्काळ संपणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन; ‘गोदा ते नर्मदा' जलयात्रेचा शुभारंभ

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या 'गोदा ते नर्मदा' जलयात्रेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे भव्य शुभारंभ झाला.

Swapnil S

त्र्यंबकेश्वर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या 'गोदा ते नर्मदा' जलयात्रेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे भव्य शुभारंभझाला. नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्याला दुष्काळमुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून येत्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने निर्मळ आणि अविरल गोदावरीसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

अहिल्यादेवींचे विचार, वारसा आणि विकास हा त्रिसूत्री मंत्र घेऊन ही यात्रा सुरू झाली आहे. कार्यक्रमाला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे पीठाधीश परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे, नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, वेदात नदीचे महात्म्य वर्णन केले असून नदीला आई मानले आहे. नदी स्तुतीसुक्तात ऋषींमुनींनी नदीच्या उपयुक्ततेचे वर्णन केले आहे. वारशाचे संवर्धन आणि विकास याचा समन्वय देशाच्या उज्वल भवितव्यासाठी आवश्यक आहे. म्हणूनच अहिल्यादेवींच्या विचाराच्या आधारे भविष्यातील विकासाची दिशा दाखविण्यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

अहिल्यादेवींचा जल व्यवस्थापनावर भर

मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जल व्यवस्थापनातील योगदानाचे स्मरण केले. ते म्हणाले, अहिल्यादेवी होळकर यांनी घाट, बारव यांची निर्मिती करताना अध्यात्मिकता आणि उपयुक्तता याचा समन्वय साधला. पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन जल व्यवस्थापनावर भर दिला. त्यांनी निर्माण केलेले बारव आजही सुस्थितीत असून त्याचे संवर्धन राज्य शासन करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. अहिल्यादेवी होळकर यांनी नद्यांचे महत्त्व जाणले आणि नदी प्रदूषण रोखण्याचे प्रयत्न केले.

जलसंवर्धनाचे कार्य जनतेत रुजवणार

मंत्री विखे-पाटील म्हणाले, त्र्यंबकेश्वर आणि चौडी येथून दोन यात्रा सुरू होत असून मध्य प्रदेशातील माहेश्वर येथे नर्मदातीरी समारोप होणार आहे. राज्यातील ३० नदीखोऱ्यांतील पाणी कलशांच्या माध्यमातून नर्मदेला अर्पण करण्यात येईल. पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी केलेले जलसंवर्धनाचे कार्य जनतेत रुजविण्याचा प्रयत्न या यात्रेद्वारे करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. नागरिकांनी या यात्रेत सहकार्य करावे, असे आवाहनही विखे-पाटील यांनी केले.

Video : नेपाळमध्ये महाप्रलय! भोटे कोशी नदीला अचानक महापूर; अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती, किमान १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता

शासकीय, खासगी, धर्मादाय रुग्णालयांचे फायर ऑडिट; तातडीने कार्यवाही करण्याचे आरोग्य मंत्र्यांचे निर्देश, राज्य सरकार ॲक्शन मोडवर

Pune : भटक्या कुत्र्याचा महिलेवर हल्ला; तोल जाताच बाळ पडलं खाली, Video व्हायरल

Mumbai : निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता; राजावाडी रुग्णालयातील अन्य डॉक्टरांवर ताण, दिवसाला ५०० रुग्णांची तपासणी

Madhya Pradesh : भाजप आमदाराने अग्निशमन दलाच्या वाहनाने धुतली स्वतःची कार; VIDEO व्हायरल