महाराष्ट्र

धनंजय आणि करूणाचे नाते 'लग्नासारखे' संरक्षण मिळण्याचा हक्क - मुंबई उच्च न्यायालय

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे आणि करूणा मुंडे यांचे नाते "लग्नासारखे" असल्याचे प्राथमिकदृष्ट्या स्पष्ट होत असल्याचे मुंबईतील सत्र न्यायालयाने म्हटले आहे.

Swapnil S

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे आणि करूणा मुंडे यांचे नाते "लग्नासारखे" असल्याचे प्राथमिकदृष्ट्या स्पष्ट होत असल्याचे मुंबईतील सत्र न्यायालयाने म्हटले आहे. तिने दोन मुलांना जन्म दिला आहे, यावरून त्यांचं नातं लग्नासारखं होतं, आणि असे नाते केवळ एकत्र राहत असल्याशिवाय शक्य नाही. त्यामुळे करूणा मुंडेला घरगुती हिंसाचार कायद्यानुसार मदतीसाठी अर्ज करण्याचा हक्क आहे, असा निर्णय न्यायालयाने दिला.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेख अकबर शेख जाफर यांनी शनिवारी दिलेल्या आदेशात, धनंजय मुंडे यांचा अंतरिम देखरेख खर्च रद्द करण्याचा अर्ज फेटाळला. धनंजय मुंडे यांनी असा दावा केला होता की, करूणा मुंडे त्यांची पत्नी नाही.

न्यायालयाने नमूद केले की, "ती कायदेशीर पत्नी आहे की नाही हे योग्य मंचावर ठरवले जाईल, मात्र तिने दोन मुलांना जन्म दिला आहे, यावरून त्यांचे नाते लग्नासारखे होते, आणि असे नाते केवळ एकत्र राहत असल्याशिवाय शक्य नाही."

न्यायालयाने म्हटले की, "एका प्रसिद्ध राजकीय व्यक्तिमत्त्वाच्या जीवनशैलीचा विचार करता, करूणा मुंडे यांना अंतरिम देखरेख खर्च देण्याचा निर्णय मॅजिस्ट्रेटचा योग्य होता. करूणा मुंडे व त्यांच्या मुलांना धनंजय मुंडे यांच्या समान जीवनशैलीचा हक्क आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केलं.

या प्रकरणात, वांद्रे मॅजिस्ट्रेट न्यायालयाने ४ फेब्रुवारी रोजी आदेश देत, धनंजय मुंडे यांना करूणा मुंडे यांना दरमहा १,२५,००० आणि मुलीला ७५,००० अंतरिम देखरेख खर्च म्हणून देण्याचे आदेश दिले होते.

धनंजय मुंडे यांनी यावर सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते. मुंडे यांची बाजू मांडताना त्यांचे वकील म्हणाले की, "ती केवळ एक उपपत्नी आहे आणि तिला कोणतीही मदत मिळण्याचा हक्क नाही." ती महिला मुंडे यांच्यासोबत 'लग्नासारख्या नात्यात' होती, असे मत न्यायालयाने व्यक्त केले.

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

शिखर धवनला ED कडून समन्स; दोषी आढळल्यास माजी क्रिकेटपटूवर काय कारवाई होणार?

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

मुंबईची वाढती तहान भागवायला आणखी दोन धरणांचा प्रस्ताव

सुप्रीम कोर्टाची राज्य सरकारला नोटीस; कॉ. पानसरे यांच्या कुटुंबीयांच्या याचिकेवर निर्देश