धनंजय मुंडे, करुणा शर्मा (डावीकडून) 
महाराष्ट्र

धनंजय मुंडेंनी माझे १८ तुकडे करण्याची धमकी दिली! करुणा शर्मा यांचा गंभीर आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करुणा शर्मा यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत.

Swapnil S

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करुणा शर्मा यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. करुणा शर्मा यांनी ऑक्टोबर २०२० पासून पोटगीची ६० लाखांची थकबाकी धनंजय मुंडे यांनी द्यावी, यासाठी वांद्रे कोर्टात तीन अर्ज दाखल केले आहेत. तसेच धनंजय मुंडे यांच्याकडून धमक्या आणि छळ सुरूच असल्याची लेखी तक्रारही करुणा शर्मा यांनी कोर्टात दिली आहे. धनंजय मुंडेंनी मला १८ तुकडे करण्याची धमकी दिली असल्याचे करुणा शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

करुणा शर्मा म्हणाल्या, मला २ लाख पोटगी मिळाली तेव्हापासून तसेच आमदारकी रद्द होणार, अशी कोर्टाकडून नोटीस आल्यापासून मला धमक्या येत आहेत. स्वतः धनंजय मुंडेंनी मला १८ तुकडे करण्याची धमकी दिली आहे. माझा अजूनही छळ सुरूच आहे. यासंदर्भात कोर्टात तक्रार दिली आहे. व्हॉट्सॲप चॅट, एनसीचे पुरावे कोर्टात दिले आहेत. पोलिसांकडेदेखील तक्रार दाखल केली आहे, मात्र ते काही करत नाहीत.

पुढे बोलताना करुणा शर्मा म्हणाल्या, ते किती पाण्यात आहेत, हे मी दाखवून देणार आहे. एफआयआर करा असे मी सांगितले होते, पण काहीही केले नाही. मला संरक्षण द्यायला कोर्टात सांगितले आहे, मात्र अद्याप काही केले नाही. मुलीला घेऊन जाणार, अशी मला धमकी दिली जात आहे. तसेच मी पोटगी लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी याचिकेद्वारे केली आहे. मी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहे. ‘लव्ह जिहाद’पेक्षादेखील जास्त माझ्यावर अन्याय होत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

लेखी तक्रारीत काय म्हटलेय?

धनंजय मुंडे हे कोर्टाच्या आदेशांना न जुमानता आपल्याला दररोज धमक्या आणि एआयच्या माध्यमातून मॉर्फ केलेले व्हिडीओ आणि फोटो पाठवून आपला छळ करत आहेत, अशी लेखी तक्रार करुणा शर्मा यांनी न्यायालयाकडे केली आहे.

ठाकरे बंधूंची यंदा 'एकत्र' दिवाळी! मनसे दीपोत्सवाचे उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते

वडिलांपेक्षा मुलगा वयाने मोठा कसा? सर्वपक्षीय शिष्टमंडळाची निवडणूक आयोगासमोर प्रश्नांची सरबत्ती, राज ठाकरेंच्या प्रश्नांनी वेधले लक्ष

IPS पूरन कुमार प्रकरणाला नवे वळण; तपास करणाऱ्या IAS अधिकाऱ्याचीही आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये गंभीर आरोप

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण : मुख्य आरोपी वीरेंद्र तावडेसह दोघांना जामीन

जैसलमेरमध्ये भीषण अपघात; खासगी बसला अचानक लागली आग, गाडी जळून खाक, ५७ जण करत होते प्रवास