(संग्रहित छायाचित्र)
महाराष्ट्र

धनगर समाजासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ‘कृती दल’

Swapnil S

प्रतिनिधी/मुंबई

राज्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविल्यानंतर आता धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याच्या दृष्टीने सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट स्थापन करण्यात आला आहे. आता धनगर समाजाच्या योजना जलदगतीने राबविण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली 'कृती दल' स्थापन करण्यात येत असल्याची घोषणा मंत्री सुरेश खाडे यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.

राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मंत्री सुरेश खाडे यांनी विधानसभेत ही माहिती दिली.

यावेळी खाडे म्हणाले की, धनगर समाजाला मुख्य समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन संवेदनशील असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विभागाचा मंत्री म्हणून मी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

धनगर समाजासाठी आदिवासी उप योजनांच्या धर्तीवर १३ योजना यशस्वीपणे राबविण्यात येत आहेत. धनगर समाजासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांचे संनियंत्रण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शक्तीप्रदत्त समिती' स्थापन करण्यात आली आहे. त्यानंतर या धनगर समाजाच्या योजना जलदगतीने राबविण्यासाठी मुख्य सचिव यांचे अध्यक्षतेखाली 'कृती दल' स्थापन करण्यात येत असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस