धाराशीवमध्ये तीन वाहनांच्या धडकेत तिघांचा मृत्यू 
महाराष्ट्र

धाराशीवमध्ये तीन वाहनांच्या धडकेत तिघांचा मृत्यू

धाराशीवमध्ये तीन कार एकमेकांना धडकल्यामुळे झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. धाराशीव-लातूर-तुळजापूर महामार्गावर पाटोदा येथील पुलावर तीन वाहनांची जोरदार धडक झाली. या धडकेत बोलेरो, वॅगन-आर आणि होंडा सिटी या तीन कारचा चुराडा झाला.

Swapnil S

धाराशीव : धाराशीवमध्ये तीन कार एकमेकांना धडकल्यामुळे झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. धाराशीव-लातूर-तुळजापूर महामार्गावर पाटोदा येथील पुलावर तीन वाहनांची जोरदार धडक झाली. या धडकेत बोलेरो, वॅगन-आर आणि होंडा सिटी या तीन कारचा चुराडा झाला.

बोलेरो कार भरधाव वेगात निघाली असताना, कारचालकाचे नियंत्रण सुटल्यानंतर ती पुढे असलेल्या वॅगन-आरला धडकली. या धडकेमुळे वॅगन-आर कार उलटली आणि दुभाजक ओलांडून दुसऱ्या बाजूला गेली. विरुद्ध दिशेने येणाऱ्या होंडा सिटी कारने बोलेरोला धडक दिली. त्यामुळे तिन्ही कारचा चेंदामेंदा झाला. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मतदकार्य सुरू केले.

जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक उपचारानंतर जखमींना धाराशीव आणि सोलापूर येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे. चौघांची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढण्यास मदत केली. तर, पोलिसांनीही माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत पंचनामा करण्यास सुरुवात केली.

नवी मुंबई APMC त कलिंगड विक्रेते हवालदिल; अफवांमुळे विक्रीत ३० टक्के घट

भय्यांना मराठी शिकवून काय साध्य होणार? राज ठाकरे यांचा सवाल राज्यकर्त्यांवर आणि माध्यमांवरही टीका

हार्बर लाइनवर आजपासून १४ एसी लोकल फेऱ्यांची भर

'राजा शिवाजी' चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा; अभिनेता, दिग्दर्शक रितेश देशमुखला मोठा दिलासा

महिनाभरात चौदा 'बाबां'चा उठला बाजार; 'खरात' प्रकरणानंतर भोंदूंचा बुरखा फाटला; लैंगिक शोषणासह आर्थिक लुटीचे प्रकार उघड