महाराष्ट्र

भीषण आगीत सहा जणांचा मृत्यू; धाराशिवमध्ये दुकानाला लागलेल्या आगीत कुटुंबातील एकमेव बचावला

दिवाळीचा सण संपूर्ण राज्यात आनंदाने आणि उत्साहात साजरा होत असताना, धाराशिव जिल्ह्यातील येडशीमध्ये भीषण आगीची दुर्घटना घडली. येडशी गावात किराणा दुकानाला लागलेल्या भीषण आगीत करंडे कुटुंबातील तब्बल सहा जणांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला.

Swapnil S

धाराशिव : दिवाळीचा सण संपूर्ण राज्यात आनंदाने आणि उत्साहात साजरा होत असताना, धाराशिव जिल्ह्यातील येडशीमध्ये भीषण आगीची दुर्घटना घडली. येडशी गावात किराणा दुकानाला लागलेल्या भीषण आगीत करंडे कुटुंबातील तब्बल सहा जणांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला. या संपूर्ण दुर्घटनेत १८ वर्षीय कृष्णा करंडे हा एकमेव कुटुंबातील सदस्य मृत्यूच्या दाढेतून परत आला.

किराणा दुकानाच्या वरच्या मजल्यावर करंडे कुटुंब राहत होते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरात लावलेल्या पणत्यांमुळे ही भीषण आग लागली. आगीने अवघ्या काही वेळातच रौद्र रूप धारण केले. ज्या ठिकाणाहून घराबाहेर पडण्याचा मुख्य रस्ता होता, नेमकी त्याच भागात आग भडकल्याने घरातील कोणालाही खाली उतरता आले नाही. धुराचे दाट लोट आणि प्रचंड उष्णतेमुळे कुटुंबातील सहा जणांचा जागीच गुदमरून मृत्यू झाला.

घटना घडल्यानंतर गावकऱ्यांनी मध्यरात्रीपासूनच आणि अग्निशमन दलाने आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, आगीची तीव्रता प्रचंड असल्याने इतरांचे प्राण वाचवता आले नाहीत. दरम्यान, घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आग नेमकी कशामुळे आणि कशी पसरली, याची सखोल माहिती घेतली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या दुर्दैवी घटनेने येडशी गावावर शोककळा पसरली आहे.

गावकऱ्यांचा कंठ दाठला

कृष्णा करंडे हा तरुण आपल्या शिक्षणासोबतच वडिलांच्या किराणा दुकानात संपूर्ण लक्ष घालायचा. दिवसभर शिक्षण आणि दुकानात आई-वडिलांना मदत करणे, असा त्याचा नित्यक्रम होता. कुटुंबाच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीत आणि व्यवसायात तो कायम सोबत असायचा. मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये कृष्णाची बहीण देखील आहे, जी शिक्षणासाठी घराबाहेर राहत होती. दिवाळीचा सण असल्याने ती आनंदाने घरी आली होती; पण कोणालाच कल्पना नव्हती की ही तिची कुटुंबासोबतची शेवटची भेट ठरेल. एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. दरम्यान, मटा ऑनलाईनच्या प्रतिनिधींनी जेव्हा तिथल्या गावकऱ्यांची प्रतिक्रिया घेतल्या, तेव्हा अक्षरक्षः त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले, त्यांचा कंठ दाठला.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

'गोकुळवर्चस्वा'चा आज फैसला; संघर्ष मोर्चात ८० हजार कोल्हापूरकर सहभागी, शासननियुक्त ४ संचालकांना मतदानाचा अधिकार

'रॉकेटबाजी'वर बंदी! आकाशात उडणारे फटाके फोडण्यास मनाई; गच्ची, गॅलरी, झोपडपट्ट्यांसह सार्वजनिक, खासगी ठिकाणी निर्बंध

Mumbai : जुहूमध्ये फटाक्यांच्या वादातून तरुणाची हत्या

IND vs NZ 3rd ODI: पाडव्याला पावसाचे पारडे जड! भारताचा आज हॅमिल्टन येथे न्यूझीलंडविरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना

संसदेचा भातुकलीचा खेळ खेळणारे नेतृत्व