धुळ्यात दुहेरी हत्याकांड; पुजेसाठी आलेल्या मित्र-मैत्रिणीची भोंदूबाबाकडून निर्घृण हत्या  
महाराष्ट्र

धुळ्यात दुहेरी हत्याकांड; पुजेसाठी आलेल्या मित्र-मैत्रिणीची भोंदूबाबाकडून निर्घृण हत्या

धुळे जिल्ह्यात शनि अमावस्येनिमित्त आश्रमात तांत्रिक विधी करण्यासाठी आलेल्या एका २५ वर्षीय महिलेची आणि तिच्या मित्राची एका भोंदू बाबाने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.

Krantee V. Kale

धुळे : धुळे जिल्ह्यात शनि अमावस्येनिमित्त आश्रमात तांत्रिक विधी करण्यासाठी आलेल्या एका २५ वर्षीय महिलेची आणि तिच्या मित्राची एका भोंदू बाबाने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी योगेश ऊर्फ भैय्या बापू खैरणार या ३३ वर्षीय स्वयंघोषित भोंदूबाबाला अटक केली असून, त्याने गुन्हा कबूल केला आहे.

कौटुंबिक वाद आणि नोकरीच्या समस्यांमुळे पीडित महिला तिच्या मित्रासह १६ मे रोजी धुळे जिल्ह्यातील जैतने गावातील खैरणार याच्या आश्रमात आली होती, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली.

खाजगी फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या या महिलेवर विधी पूर्ण झाल्यानंतर आरोपीने दुचाकीवरून घरी सोडताना जंगलात बलात्काराचा प्रयत्न केला. महिलेने विरोध करून आरडाओरडा केल्यावर आरोपी खैरणार याने कपड्याने तिचा गळा दाबून खून केला आणि मृतदेह रायपूर-भादगाव रस्त्याशेजारी दगड ठेवून लपवून ठेवला.

यानंतर आरोपीने आश्रमात परतत महिलेच्या मित्राची लोखंडी गदा किंवा रॉडने मारून हत्या केली आणि त्याचा मृतदेह बैलगाडीतून नेऊन दोन टेकड्यांच्या दरम्यान फेकून दिला.

Jharkhand Student Protest : भरती परीक्षांविरोधात आंदोलन; बॅरिकेड्स तोडून हजारो विद्यार्थ्यांचा विधानसभेवर मोर्चा, Video

प्रवाशांसाठी मोठी सोय; आता Cityflo ॲपवरून बुक करा मुंबई अन् दिल्ली मेट्रोचे QR तिकीट

युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला; १२ जणांचा मृत्यू, ३९ जखमी, Video

पतीचा शोध घेत फ्लॅटवर पोहोचली, दुसऱ्या महिलेसोबत पाहताच राडा; दोघींची तुफान हाणामारी, VIDEO

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनासाठी दिल्ली मेट्रोचा खास अंदाज; 'हर घर तिरंगा' थीमवर साकारली विशेष ट्रेन