महाराष्ट्र

अजित पवार यांची राष्ट्रवादीत घुसमट होतेय; शिंदे गटाच्या 'या' नेत्याची मोठी ऑफर!

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्यावर नाराज असल्याच्या होत्या चर्चा, अजित पवारांना विचारताच पत्रकारांवर भडकले

प्रतिनिधी

हिवाळी अधिवेशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचे निलंबन केल्यानंतर त्यांच्यावतीने माफी मागितली होती. यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नाराज असल्याच्या चर्चा गेले काही दिवस राजकीय वर्तुळात होत्या. विरोधीपक्ष नेते म्हणून आक्रमक भूमिका घेत नसल्याची टीका त्यांच्याच पक्षातील काही नेते करत असल्याच्या वावड्याही उठलेल्या. यावरून अजित पवारांना प्रश्न विचारला असता ते पत्रकारांवर भडकले म्हणाले, 'मी काही दुधखुळा नाही. विरोधीपक्ष नेत्याचे काम काय असते? ते मला कळते' यावरून शिंदे गटाच्या नेत्यांना त्यांना पक्षात येण्याची ऑफर दिली.

शिंदे गटाचे नेते आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, "राजकारणातही मैत्री आहे. एकमेकांबद्दल आदरही आहेच. तसेच, अजित पवार यांच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना आदर आहे. ते जर आमच्यासोबत आले, तर आनंदच होईल. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांची जी घुसमट होत आहे, ते सगळेच बघत आहेत. त्यामुळे त्यांच्या सारखा उमदा नेता आमच्यासोबत आला, तर आम्हाला नक्कीच आनंद होईल." यामुळे आता राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरु झाली आहे.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन