चंद्रशेखर बावनकुळे संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

राज्यातील सर्वच शिव पाणंद आणि शेत रस्त्यांची हद्द निश्चित करून रस्त्यांची कामे दर्जेदाररित्या पूर्ण करा.

Swapnil S

मुंबई : राज्यातील सर्वच शिव पाणंद आणि शेत रस्त्यांची हद्द निश्चित करून रस्त्यांची कामे दर्जेदाररित्या पूर्ण करा. तसेच शेत रस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा, असे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभागाला दिले आहेत. तसेच दर्जेदार रस्त्यांसाठी नागपूर पॅटर्न अमलात आणण्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

शिव पाणंद आणि शेत रस्ते समृद्ध करण्याबाबत पब्लिक डोमेनच्या माध्यमातून नागरिकांच्या सूचना मागविण्यात आल्या होत्या. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी जमा बंदी आयुक्त सुहास दिवसे, नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे या बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

नागपूर जिल्ह्यात प्रती किलोमिटर केवळ आठ ते दहा लाख रुपये खर्चामध्ये उत्कृष्ट पाणंद रस्ते बनविण्यात आले आहेत. या कार्यपद्धतीचा सर्व जिल्ह्यांनी अभ्यास करून इतर जिल्ह्यांमध्ये याप्रमाणे कार्यवाही करावी. तसेच ग्रामस्तरीय शेत रस्ता समिती स्थापन करून त्याचा अहवाल शासनास सादर करावा. रस्त्यांचे काम दर्जेदार होईल, याची दक्षता घ्यावी. पाणंद रस्त्यांबाबत प्रलंबित असलेली प्रकरणे एका महिन्यात निकाली काढावीत, असे निर्देश बावनकुळे यांनी दिले.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री