PTI
महाराष्ट्र

शिवसेना-राष्ट्रवादी आमदार अपात्रता: आता तुम्हीच खुर्चीवर बसा अन् ठरवा! सरन्यायाधीशांनी वकिलाला सुनावले

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा खटला तातडीने चालवून लवकर निकाल द्यावा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वकिलांनी केली. यामुळे संतापलेल्या सरन्यायाधीशांनी ‘आता तुम्हीच येऊन खुर्चीवर बसा आणि ठरवा’, अशा शब्दांत ठाकरे गटाच्या वकिलाला सुनावले.

Swapnil S

नवी दिल्ली : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा खटला तातडीने चालवून लवकर निकाल द्यावा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वकिलांनी केली. यामुळे संतापलेल्या सरन्यायाधीशांनी ‘आता तुम्हीच येऊन खुर्चीवर बसा आणि ठरवा’, अशा शब्दांत ठाकरे गटाच्या वकिलाला सुनावले.

शिवसेना-राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात मंगळवारी होती. मात्र त्याची सुनावणी आजही होऊ शकली नाही. परंतु सरन्यायाधीशांनी अजित पवारांसह त्यांच्या ४१ आमदारांना पुढील ३ आठवड्यांत जयंत पाटील यांच्या याचिकेवर उत्तर देण्याची मुदत दिली आहे, तर शिवसेनेबाबतचे हे जुने प्रकरण असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी कोर्टात उत्तरही सादर केले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही बाजूच्या वकिलांना संकलन तयार करून ते सादर करण्यास सांगितले आहे.

या खटल्यावर सुनावणी सुरू असताना शिवसेनेच्या वकिलांनी सरन्यायाधीशांकडे हे प्रकरण लवकरात लवकरच संपवण्याचा हेका धरला. तुम्ही लवकरची तारीख द्या, अशी मागणी करताच त्यावर सरन्यायाधीश संतापले. “मग तुम्हीच येऊन इथे बसा. आमच्यावर खूप ताण असतो, तुम्हाला १-२ दिवसांत तारीख दिली जाईल,” असे सरन्यायाधीश म्हणाले.

सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये निकाल लागण्याची शक्यता

शिवसेनेच्या दोन्ही बाजूंनी संकलन दिल्यानंतर ही सुनावणी सुप्रीम कोर्टातच चालेल. सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये या प्रकरणाचा निकाल लागण्याची शक्यता आहे. आज दोन्ही प्रकरणाची सुनावणी झाली नसली तरीही सप्टेंबरमध्ये तारीख येईल. तेव्हा दोन्ही प्रकरणे ऐकली जातील आणि त्यावर निकाल येईल, असे वकील सिद्धार्थ शिंदे यांनी म्हटले आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती, तर राष्ट्रवादीकडून जयंत पाटील यांनीही याचिका दाखल केली आहे. राहुल नार्वेकर यांनी शिवसेना, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील एकाही आमदारावर अपात्रतेची कारवाई केली नाही. एकनाथ शिंदेंसह त्यांच्या आमदारांना अपात्र ठरवले नाही. त्यामुळे ठाकरे गटाच्या सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती आणि अजित पवारांसह आमदारांना अपात्र न ठरवल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या जयंत पाटलांनीही सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी