महाराष्ट्र

दिवाळीत देखील मिळणार आनंदाचा शिधा ; 'या' दोन जिन्नसांचा होणार समावेश

Rakesh Mali

आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दिवाळीनिमित्त शिधापत्रिका धारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेण्यात आला. या शिध्यात मैदा आणि पोह्याचा देखील समावेश करण्यात आला आहे. पूर्वी आनंदाचा शिध्यात रवा, चना दाळ, साखर आणि खाद्यतेल असे चार जिन्नस होते. मात्र आता यात पोहे आणि मैद्याया दोन वस्तूंची भर पडणार आहे.

राज्यातील अंत्योदन अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक त्याच बरोबर छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा अशा आत्महत्या शेतकरी ग्रस्त १४ जिल्ह्यांतील दारिद्र रेषेवरील केशरी शेतकरी अशा १ कोटी ६६ लाख ७१ हजार ४८० शिधापत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिधा मिळणार आहे.

राज्य सरकारकडून दिवाळीच्या सणानिमित्ताने देण्यात येणाऱ्या या शिध्यात १ किलो साखर., १ लिटर खाद्यतेल, अर्धा किलो रवा, चना डाळ, मैदा आणि पोहे या इत्यादी जिन्नस असतील. २५ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर या काळात या शिध्याचं वितरण करण्यात येईल. यासाठी येणार्या एकून ५३० कोटी १९ लाख इकत्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली आहे.

"ज्यावेळी पक्ष धोक्यात येतो तेव्हा ते काँग्रेसमध्ये जातात," फडणवीसांची शरद पवारांवर टीका...

कराडसह साताऱ्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी: वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी मोठे नुकसान 

"उद्धव ठाकरे जेलमध्ये असतील..." अरविंद केजरीवाल नेमकं काय म्हणाले?

छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा, क्रांती चौकात शिंदे-ठाकरे गट आमनेसामने

"शरद पवारांना ऑफर नव्हती, तो सल्ला होता..." नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावर फडणवीसांचं स्पष्टीकरण