THANE : रामनवमीनिमित्त ट्रॅफिक निर्बंध; वागळे परिसरातील अनेक रस्ते बंद, पर्यायी मार्ग कोणते?

ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात राम नवमी मिरवणुकीमुळे २६ मार्च रोजी वाहतूक निर्बंध लागू असणार आहे. पर्यायी मार्गांची माहिती जाणून घ्या.
THANE : रामनवमीनिमित्त ट्रॅफिक निर्बंध; वागळे परिसरातील अनेक रस्ते बंद, पर्यायी मार्ग कोणते?
THANE : रामनवमीनिमित्त ट्रॅफिक निर्बंध; वागळे परिसरातील अनेक रस्ते बंद, पर्यायी मार्ग कोणते?
Published on

राम नवमीनिमित्त मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील वागळे इस्टेट उपविभागातील अनेक रस्ते गुरुवार (दि.२६ मार्च) रोजी दुपारी १ ते रात्री ११ या वेळेत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. सुमारे ९ ते १० हजार नागरिक या मिरवणुकीत सहभागी होण्याची अपेक्षा असल्याने वाहतूक पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.

'या' मार्गांवरून मिरवणूक

ही मिरवणूक हनुमाननगर, वागळे बस डेपो, साठेनगर आणि इंदिरानगर कामगार नाका या प्रमुख मार्गांवरून जाणार आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विविध ठिकाणी प्रवेशबंदी आणि वाहतूक वळवण्यात येणार आहे.

वाहतूक बदल कसे असतील?

  • हनुमाननगर सर्कल : रामनगर सर्कलहून वागळे बस डेपोच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद
    पर्याय : रामनगर सर्कलवरून सरळ जाऊन सर्कल क्रमांक २२ येथे उजवीकडे वळावे.

  • रोड क्रमांक १६ ते सर्कल २२ मार्ग : साठेनगर ते इंदिरानगर मार्ग बंद
    पर्याय : सर्कल २२ येथे यू-टर्न घेऊन रोड क्रमांक २१ वरून पुढे जावे.

  • लोकमान्य बस डेपो ते इंदिरानगर : सावरकर नगर पोलीस चौकी येथे प्रवेशबंदी
    पर्याय : चौकीवरून डावीकडे वळून पर्यायी मार्ग वापरावा

  • आर. जे. ठाकूर कॉलेज परिसर : यशोधन नगर ते डावले नगर तसेच महात्मा फुले नगरमार्गे कामगार नाका येथे प्रवेश बंद
    पर्याय : जवळच्या पर्यायी मार्गांद्वारे वाहतूक वळवली जाईल

THANE : रामनवमीनिमित्त ट्रॅफिक निर्बंध; वागळे परिसरातील अनेक रस्ते बंद, पर्यायी मार्ग कोणते?
Mumbai : वडाळ्यात ट्रॅफिक बदल; 'हा' रस्ता २२ मेपर्यंत बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

आपत्कालीन सेवांना सूट

अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि पोलिसांची वाहने यांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे, असे वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे.

THANE : रामनवमीनिमित्त ट्रॅफिक निर्बंध; वागळे परिसरातील अनेक रस्ते बंद, पर्यायी मार्ग कोणते?
ठाणेकरांनो लक्ष द्या! कल्याण-शिळ रोडवर ३१ मार्चपर्यंत वाहतूक बंद; पर्यायी मार्ग कोणते?

प्रवाशांना सूचना

वागळे इस्टेट परिसरात या वेळेत वाहतुकीत विलंब होण्याची शक्यता असल्याने वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि प्रवासाचे नियोजन आधीच करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in