महाराष्ट्र

"आता संभाजी भिडेला फाशी लावणार का?" नाना पटोले यांचा देवेंद्र फडणवीस यांना सवाल

नवशक्ती Web Desk

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल संभाजी भिडेने अत्यंत अश्र्लाघ्य भाषा वापरुन अकलेचे तारे तोडले असून संभाजी भिडे सातत्याने महापुरुषांबद्दल अवमानकारक विधानं करत असतो. पण भाजप सरकार त्यावर कारवाई करत नाही. संभाजी भिडेच्या माध्यमातून भाजपाला मणिपूरसारखा महाराष्ट्र पेटवायचा आहे का? असा संतप्त सवाल महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

यावेळी बोलाताना नाना पटोले म्हणाले की, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविरोधात सोशल मीडियावर बदनामीकारक लिखाण केल्याच्या मुद्दा विधानसभेत चर्चेला आला होता. त्यावेळी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रवृत्तींच्या फक्त मुसक्या आवळून चालणार नाही तर त्यांना फाशी लावली पाहीजे, असं म्हटलं होतं. आता देवेंद्र फडणवीस संभाजी भिडेला फाशी देणार का? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.

यावेळी बोलताना नाना पटोले यांनी भीमा कोरेगाव प्रकरणाला हात घातला, भीमा कोरेगाव प्रकरणात देखील संभाजी भिडेचा हात होता, पण तो अजुन मोकाटच आहे. भारतीय जनता पक्षाचे सरकार संभाजी भिडेवर एवढे मेहरबानी का दाखवत आहे. संभाजी भिडे, भाजपा, आरएसएस यांचे संबंध सर्वांना माहिती आहेत, असं म्हणत भाजपने भिडे संर्भातील आपली भूमिका स्पष्ट करावी, असं देखील पटोले म्हणाले.

कारवाई होत नाही तोवर गप्प बसणार नाही

मुजोर संभाजी भिडेला अटक करण्याची मागणी काँग्रेसने अधिवेशनात लावून धरली आहे. राज्य सरकारने भिडेला अटक करुन कडक शिक्षा ठोठावण्याची प्रतिक्षा काँग्रेस करत आहे. अधिवेशनाला ४ दिवस सुट्टी आहे. संभाजी भिडेवर कारवाई न झाल्यास अधिवेशनात काँग्रेस संभाजी भिडे प्रश्नी सरकारला धारेवर धरेल. यावेळी संभाजी भिडेला अटक करुन कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत काँग्रेस गप्प बसणार नाही, असा इशारा देखील नाना पटोले यांनी दिला.

दरम्यान, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी संभाजी भिडे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने काँग्रेस पक्ष राज्यभर आक्रमक झाला आहे. भिडेंच्या विरोधात राज्यभर तीव्र आंदोलने सुरु आहेत. अनेक ठिकाणी त्यांचा पुतळा जाळून व प्रतिमेला जोडे मारुन तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.

Video : बिनशर्त पाठिंब्यानंतर नरेंद्र मोदी अन् राज ठाकरे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर, समोर आला पहिला टिझर

Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीला किती जागा मिळणार? शरद पवारांनी वर्तवला अंदाज

पाच वर्षाच्या मुलामुळे बंद होणार दारूची दुकाने, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

EVM की खेळणं! BJP नेत्याच्या लहान मुलानं केलं मतदान; नेत्यावर गुन्हा दाखल, अधिकारी निलंबित

Nagpur Shocker : शाळेतून घरी सोडणाऱ्या रिक्षाचालकाने केला १० वीच्या मुलीचा विनयभंग; Video व्हायरल झाल्यावर घटना उघडकीस