PM
महाराष्ट्र

डॉ. शरदकुमार दीक्षित स्मरणार्थ मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर

नवशक्ती Web Desk

छत्रपती संभाजीनगर :  लायन्स क्लब ऑफ छत्रपती संभाजीनगर चिकलठाणातर्फे आणि महात्मा गांधी मिशन (एमजीएम) तसेच छत्रपती संभाजीनगर केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या सहकार्याने पद्मश्री डॉ. शरदकुमार दीक्षित यांच्या स्मरणार्थ आयोजित ४७ व्या मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराला बुधवारपासून प्रारंभ होत असून, शिबीर रविवार  दि. १७ पर्यंत चालेल. शिबिरात अमेरिकेतील प्रख्यात प्लास्टिक सर्जन डॉ. राज लाला,  डॉ. ललिता लाला, डॉ. अमित बसन्नवार हे रुग्णांवर शस्त्रक्रिया करतील.

शिबिराचे उदघाटन सकाळी नऊ वाजता लायन्सचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ला. सुनील देसरडा यांच्या हस्ते आणि डॉ. राज लाला तसेच त्यांचे सहकारी डॉक्टर यांच्या उपस्थितीत होईल. या प्रसंगी एमजीएम मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. राजेंद्र बोहरा, औरंगाबाद  केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन अध्यक्ष नितीन देशमुख यांची प्रमुख उपस्थिती असेल.

या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन लायन्स क्लब ऑफ लायन्स क्लब छत्रपती संभाजीनगर चिकलठाणाच्या अध्यक्षा डॉ. उज्वला दहिफळे, सचिव संदीप ताठे प्रकल्प प्रमुख भूषण जोशी. प्रकल्प सहप्रमुख सुदर्शन पोटभरे, महेश बुर्हाडे आणि सर्व पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त