'लातूर पॅटर्न'चा महामेरू हरपला; डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन 
महाराष्ट्र

'लातूर पॅटर्न'चा महामेरू हरपला; डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन

लातूरच्या शैक्षणिक वैभवाला नवे परिमाण देणारे, 'लातूर पॅटर्न' चे जनक, ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ व माजी राज्यसभा खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे मंगळवारी निधन झाले.

Swapnil S

लातूर: लातूरच्या शैक्षणिक वैभवाला नवे परिमाण देणारे, 'लातूर पॅटर्न' चे जनक, ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ व माजी राज्यसभा खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या जाण्याने लातूरसह संपूर्ण मराठवाड्यावर शोककळा पसरली असून शिक्षण, वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून ते आजारी होते. लातूरमधील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने लातूर पॅटर्नचा आधारवड कोसळला, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून डॉ. पाटील यांनी लातूरला देशाच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून दिले.

'लातूर पॅटर्न' ही केवळ शिक्षणपद्धती नसून हजारो विद्यार्थ्यांच्या यशस्वी भवितव्याची पायाभरणी ठरली. ३ ऑक्टोबर १९३९ रोजी धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील कवठा येथे त्यांचा जन्म झाला. ओस्मानिया विद्यापीठातूनएमबीबीएस व डीसीएच पदवी प्राप्त करून १९६५ साली त्यांनी लातूरमध्ये वैद्यकीय सेवेला सुरुवात केली. मराठवाड्यातील नामवंत बालरोगतज्ज्ञ म्हणून त्यांनी हजारो रुग्णांवर उपचार केले. मुरुड परिसरात तब्बल १२ वर्षे विनामूल्य सेवा देत त्यांनी 'देवमाणूस' म्हणून लोकांच्या मनात स्थान निर्माण केले.

१९९४ ते २००० या कालावधीत त्यांनी राज्यसभेचे सदस्य म्हणून कार्य करत वाणिज्य, परराष्ट्र व्यवहार आणि रेल्वे अशा महत्त्वाच्या संसदीय समित्यांवर उल्लेखनीय कामगिरी बजावली. १९९८ साली त्यांना 'सर्वोत्कृष्ट डॉक्टर संसदपटू' हा सन्मान मिळाला होता.

Video : नेपाळमध्ये महाप्रलय! भोटे कोशी नदीला अचानक महापूर; अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती, किमान १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता

शासकीय, खासगी, धर्मादाय रुग्णालयांचे फायर ऑडिट; तातडीने कार्यवाही करण्याचे आरोग्य मंत्र्यांचे निर्देश, राज्य सरकार ॲक्शन मोडवर

Pune : भटक्या कुत्र्याचा महिलेवर हल्ला; तोल जाताच बाळ पडलं खाली, Video व्हायरल

Mumbai : निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता; राजावाडी रुग्णालयातील अन्य डॉक्टरांवर ताण, दिवसाला ५०० रुग्णांची तपासणी

Madhya Pradesh : भाजप आमदाराने अग्निशमन दलाच्या वाहनाने धुतली स्वतःची कार; VIDEO व्हायरल