महाराष्ट्र

महाराष्ट्रात भाजपचा काँग्रेसला दे धक्का; प्रदेश काँग्रेसचे कोडवते दाम्पत्य भाजपमध्ये

Swapnil S

मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेस नेते, प्रदेश काँग्रेसचे सचिव डॉ. नितीन कोडवते व त्यांच्या पत्नी डॉ. चंदा कोडवते या दाम्पत्याने भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या या प्रवेशाच्या कार्यक्रमात खा. अशोक नेते, आ. बंटी भांगडिया, बाबुराव घोडे, मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, भाजप प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते. कोडवते पती-पत्नीच्या भाजप प्रवेशामुळे भारतीय जनता पक्षाच्या संघटना वाढीसाठी मदत होईल असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.

डाॅ. कोडवते यांनी कोरोना काळात गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी समाजाची निरपेक्षपणे सेवा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत घडवण्याच्या संकल्पाला साथ देण्यासाठी डॉ. कोडवते दाम्पत्याने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सर्वांच्या पाठीशी एक कुटुंब या नात्याने पक्ष संघटना खंबीरपणे उभी राहील. डॉ. कोडवते दाम्पत्याने कोणतीही अपेक्षा न ठेवता भाजपमध्ये प्रवेश केला आहे, असे बावनकुळे म्हणाले.

मोदी सरकारच्या विकासकार्याने प्रभावित होऊन आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मोदी यांच्या विकासाच्या संकल्पनेवर विश्वास ठेवून गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी हा निर्णय घेतला आहे. यापुढे भाजपसाठी निरपेक्ष भावनेने काम करू, असे डॉ. नितीन व डॉ. चंदा यांनी यावेळी सांगितले. डॉ. चंदा यांनी २०१९ मध्ये गडचिरोली विधानसभा निवडणूक काँग्रेसकडून लढवत ७० हजार मते मिळवली होती.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस