फलटण येथील डॉ संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी कळवा रुग्णालयातील डॉक्टरांचे एक दिवस काम बंद आंदोलन छायाचित्र : दीपक कुरकुंडे
महाराष्ट्र

डॉ. संपदा मुंडे मृत्यू प्रकरण : बेटी पढ़ी, पर बची नहीं... डॉक्टरांचे काम बंद आंदोलन; अधिकाऱ्यांचाही इशारा

बीड जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील डॉ. संपदा मुंडे यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे.

Swapnil S

मुंबई : बीड जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील डॉ. संपदा मुंडे यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. राज्यातील डॉक्टरांच्या संघटनांनी या घटनेचा निषेध करत निष्पक्ष चौकशीसह डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करा या मागणीसाठी सोमवारी राज्यातील डॉक्टरांनी काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आज मंगळवारपासून आपत्कालीन सेवा वगळता ओपीडीसह निवडक सेवा बंद असणार, असा इशारा केईएम रुग्णालयातील मार्ड संघटनेने दिला आहे. दरम्यान, सोमवारी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगरसह सर्व प्रमुख शहरांतील शासकीय आणि पालिका रुग्णालयांमध्ये डॉक्टरांनी कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसल्याने रुग्ण सेवेवर परिणाम झाला.

मुंबईतील नायर, सायन, कूपर आदी प्रमुख रुग्णालयांमध्ये बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. रुग्णालय परिसरात हातात पोस्टर घेऊन “नो सेफ्टी, नो सर्विस”, “बेटी पढ़ी, पर बची नहीं” अशा घोषणांसह डॉक्टर व वैद्यकीय विद्यार्थी आंदोलनात उतरले आहेत. रुग्णसेवा ठप्प झाल्याने रुग्णांना मोठा फटका बसला असून प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापकांकडून तात्पुरत्या स्वरूपात सेवा सुरू ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. २३ ऑक्टोबर रोजी फलटण येथील हॉटेलमध्ये या महिला डॉक्टरने आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी तिने तळहातावर सुसाईड नोट लिहीत पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदणे आणि प्रशांत बनकर- शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता.

बेटी पढ़ी, पर बची नहीं... डॉक्टरांचे काम बंद आंदोलन

अधिकाऱ्यांचाही इशारा

महिला डॉक्टरच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या दोषींवर दहा दिवसांत योग्य कारवाई न केल्यास महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने सोमवारी निदर्शने करण्याची धमकी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना लिहिलेल्या निवेदनात, महासंघाने सरकारने या प्रकरणाची चौकशी पूर्ण करावी आणि दहा दिवसांत जलदगती न्यायालयात खटला चालवून दोषींना शिक्षा करावी, अशी मागणी केली आहे.

मृत डॉक्टरच्या कुटुंबीयांना आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना पुरेशी सुरक्षा आणि एसआयटी स्थापन करावी अशी इतर मागण्या आहेत.

मध्य महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील रहिवासी असलेली ही डॉक्टर २३ ऑक्टोबर रोजी सातारा जिल्ह्यातील फलटण शहरातील एका हॉटेलच्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळली.

तिच्या तळहातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये तिने आरोप केला आहे की, उपनिरीक्षक गोपाल बदाणे यांनी तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला. तर सॉफ्टवेअर इंजिनिअर प्रशांत बनकर यांनी तिचा मानसिक छळ केला. दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

डॉक्टर संघटनांच्या प्रमुख मागण्या :

  • प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात व्हावी

  • डॉक्टर कुटुंबाला ५ कोटींची आर्थिक मदत मिळावी

  • डॉक्टरांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात

महाराष्ट्र जनविश्वास अध्यादेश : किरकोळ अपराधासाठी आता फक्त दंड, तुरुंगवास नाही; ७ कायद्यांतील छोटे गुन्हे 'डिक्रिमिनलाइज'

Navi Mumbai : वन खात्याच्या बोटचेप्या धोरणाचा फटका महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना; आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटीसह अनेकांवर परिणाम

तिरुमला तिरुपती देवस्थानास वांद्रे येथील जमीन; ३० वर्षांसाठी नाममात्र १ रुपया भाडे; ३९५ चौ.मी जमिनीवर पार्किंग, कार्यालय

Mumbai : बिग बींची स्मार्ट गुंतवणूक! अमिताभ बच्चन यांनी विकले गोरेगावमधील दोन आलिशान फ्लॅट्स; १३ वर्षांत तब्बल ३.८ कोटींचा नफा

'पान मसाला' जाहिरातीवरून सलमान खानला नोटीस; भाजप नेत्याने दाखल केली तक्रार