महाराष्ट्र

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडी ची नोटीस ; नेमके प्रकरण काय ?

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज येणार असून जयंत पाटील यांना नोटीस मिळण्याच्या काही तास आधी हा योगायोग आहे की काय ?

नवशक्ती Web Desk

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. जयंत पाटील यांना IL आणि FS प्रकरणांमध्ये नोटीस बजावण्यात आल्याची माहिती मिळत आहे. आज सर्वोच्च न्यायालय सत्तासंघर्षाचा निकाल देणार आहे. अशात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीच्या नोटीस मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज येणार असून जयंत पाटील यांना नोटीस मिळण्याच्या काही तास आधी हा योगायोग आहे की काय, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे.

नेमके प्रकरण काय आहे?

ईडी आयएल आणि एफएस कंपन्यांच्या व्यवहाराची चौकशी करत होती. कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली होती. या कंपनीच्या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला. यापूर्वीही या कंपनीप्रकरणी राज ठाकरेंना नोटीसही पाठवण्यात आली होती. आर्थिक व्यवहारात अनियमितता होती. मनी लाँड्रिंग झाली आणि पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अरुणकुमार साहा याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. यामध्ये अनेकांची नावे पुढे आली. त्यात जयंत पाटील यांच्या नावाचाही समावेश आहे. ईडीने नोटीस पाठवल्याच्या वृत्तावर जयंत पाटील म्हणाले की, अशी कोणतीही नोटीस अद्याप आलेली नाही.

ओला दुष्काळ जाहीर करण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नकार; पण सर्व सवलती लागू, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! क्वेट्टामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, १० ठार, भयानक व्हिडिओ समोर

Dombivali : झोपेतच सर्पदंश! ३ वर्षांच्या चिमुकलीसह मावशीचा मृत्यू; KDMC रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत