महाराष्ट्र

कराडजवळ आयशरला कारची जोरदार धडक; एक जण किरकोळ जखमी

Swapnil S

कराड : येथून जात असलेल्या पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर, ता.कराड हद्दीत लोटस फर्निचरच्या पाठीमागील बाजूच्या रस्त्यावरून जाणाऱ्या एका आयशर टेम्पोला पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने जोराची धडक दिली. मंगळवारी, २०फेब्रुवारी रोजी २ वा.च्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. यामध्ये आयशर व कारचे पुढील बाजूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, एकजण गंभीर आहे.

आयशर टेम्पो क्रमांक (केए ५१ एएच ०८६५) हा निघाला पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून निघाला असताना तो कराडनजीक मलकापूर हद्दीत लोटस फर्निचर परिसरात आला. यावेळी टेम्पोने रस्त्याच्या असलेल्या साईटला कठड्यास जोरात धडक दिली. यावेळी पाठीमागून एक कार क्रमांक (एमएच ०९ जीडी ६९००) हि टेम्पोखाली शिरली. त्यामध्ये कारमधील एकजण गंभीर जखमी झाला. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या धडकेत कारचे पुढील बाजूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

या अपघाताची माहिती कराड शहर पोलीसांना मिळताच संबंधित विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस व नागरिकांनी घटनास्थळी मदत केली. यानंतर दोन्ही वाहने क्रेनच्या साह्याने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

पुण्यासह सांगली,मिरज,कोल्हापूर आणि सोलापूर रेल्वे स्थानके बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला पोलीसांनी ठोकल्या बेड्या

सूनेनं केली सासऱ्याच्या घरात चोरी, मामेभावासोबत केलं परफेक्ट प्लॅनिंग, तीन लाखांची रोकड चोरली

"नव्या भारतासाठी ‘हिंदवी स्वराज्या`ची गरज!" योगी आदित्यनाथ यांची तोफ नालासोपाऱ्यातून धडाडली!

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग

कार देणार बाईकएवढं मायलेज! 'ही' CNG कार लवकरच होतीये लॉन्च, किती असेल किंमत?