PTI
महाराष्ट्र

ईद-ए-मिलादची सुट्टी सोमवारऐवजी बुधवारी; राज्य सरकारकडून अधिसूचना जारी

सोमवार, १६ सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलादची सुट्टी त्या दिवशी न देता बुधवार, १८ सप्टेंबर रोजी जाहीर करावी अशी मागणी काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.

Swapnil S

मुंबई : सोमवार, १६ सप्टेंबर

रोजी ईद-ए-मिलादची सुट्टी त्या दिवशी न देता बुधवार, १८ सप्टेंबर रोजी जाहीर करावी अशी मागणी काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. अखेर सोमवारची सुट्टी रद्द करत बुधवार, १८ सप्टेंबर रोजी ईद-ए- मिलादची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबत राज्य सरकारने शनिवारी अधिसूचना जारी केली आहे.

राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या २४ सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद या सणाची सुट्टी सोमवार, १६ सप्टेंबर रोजी दर्शवण्यात आलेली आहे. ईद-ए-मिलाद हा सण मुस्लिम बांधव उत्साहात साजरा करतात. यावेळी जुलूस कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मंगळवार, १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी हा हिंदूंचा सण असल्याने दोन्ही समाजांमध्ये शांतता व सामाजिक सलोखा कायम राहण्याच्या हेतूने यावर्षी मुंबई शहर, मुंबई उपनगर व इतर काही जिल्ह्यांमध्ये मुस्लिम धर्मीयांनी बुधवार, १८ सप्टेंबर रोजी जुलूस काढण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांत सोमवार, १६ सप्टेंबरसाठी जाहीर केलेली ईद- ए-मिलादची सार्वजनिक सुट्टी रद्द करून ती आता बुधवार, १८ सप्टेंबर या दिवशी जाहीर करण्यात आली असल्याची अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे.

दरम्यान सोमवार, १६ सप्टेंबर रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेची सर्व कार्यालये तसेच सर्व शाळा नियमितपणे सुरू राहणार असल्याचे पालिका प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले