पीटीआय
महाराष्ट्र

फडणवीसांनी दिला होता राज्यपालपदाचा प्रस्ताव; एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

'मी माझ्या एकुलत्या एक मुलीची शपथ घेऊन सांगतो, हा देवेंद्र फडणवीस याचा शब्द आहे', असे फडणवीस म्हणाले होते. मात्र पुढे काय झाले त्याची आपल्याला कल्पना नाही, पण फडणवीस यांनी २०१९ मध्ये...

Swapnil S

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यासमोर राज्यपालपदाचा प्रस्ताव ठेवला होता आणि त्यासाठी मनापासून प्रयत्न करीन, असे आश्वासन देताना फडणवीस यांनी स्वत:च्या मुलीचीही शपथ घेतली होती. त्यानंतर दिल्लीतील एका अतिज्येष्ठ नेत्याने आपल्याला दूरध्वनी केला. त्यामुळे आपण भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना केला.

फडणवीस यांनी एक दिवस आपल्याला बोलाविले, त्यावेळी आम्ही तेथे दोघेच होतो. नाथाभाऊ मी तुमची राज्यपालपदासाठी शिफारस करतो, असे फडणवीस म्हणाले. तेव्हा, देवेंद्रजी खरे सांगा, तुम्ही मला अनेकदा सांगितले की हे करणार, ते देणार, मात्र तसे काहीच झाले नाही. त्यामुळे माझा विश्वास बसत नाही, असे आपण फडणवीस यांना सांगितले, असे खडसे म्हणाले. तेव्हा फडणवीस म्हणाले की, मी माझ्या एकुलत्या एक मुलीची शपथ घेऊन सांगतो, हा देवेंद्र फडणवीस याचा शब्द आहे. मात्र पुढे काय झाले त्याची आपल्याला कल्पना नाही, पण फडणवीस यांनी २०१९ मध्ये हे आश्वासन दिले होते, असे खडसे म्हणाले.

ज्यावेळी आपण भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा आपली खरी तशी इच्छा नव्हती. दिल्लीतील एका अतिज्येष्ठ नेत्याने आपल्याला दूरध्वनी केला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश झाला, तेव्हा रक्षा खडसेही तेथे हजर होत्या. माझ्या गळ्यात भाजपचा मफलर घालण्यात आला, मात्र पाच-सहा महिने उलटूनही पक्ष प्रवेश जाहीर झाला नाही, अशी खंत खडसे यांनी व्यक्त केली. भाजपमध्ये प्रवेश करतो, असे आपण कधीही म्हटले नाही. त्यांनी आपल्याला प्रवेश करा, असे सांगितले. त्यानंतर आपण शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली. भाजपसाठी ४० वर्षे काम केले. त्यामुळे आपल्याला पक्षात घ्या, अशी विनंती करणे आपल्यासाठी अतिशय अपमानास्पद आहे, असेही खडसे म्हणाले.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी