एकनाथ खडसे  संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

एकनाथ खडसे यांच्या घरफोडी प्रकरणाचा उल्हासनगरात धागा; दोन जण अटकेत, तीन फरार

या प्रकरणात पोलिसांनी उल्हासनगरातील दोन जणांना अटक करून सुमारे ६ लाख २१ हजार रुपयांचा सोने-चांदीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे, तर मुख्य तीन आरोपी अद्याप फरार असून, पोलिसांचे विशेष पथक त्यांचा शोध घेत आहे.

Swapnil S

उल्हासनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांच्या ‘मुक्ताई’ या जळगावातील बंगल्यात झालेल्या थरारक चोरी प्रकरणाचा तपास आता उल्हासनगरकडे वळला आहे. या प्रकरणात पोलिसांनी उल्हासनगरातील दोन जणांना अटक करून सुमारे ६ लाख २१ हजार रुपयांचा सोने-चांदीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे, तर मुख्य तीन आरोपी अद्याप फरार असून, पोलिसांचे विशेष पथक त्यांचा शोध घेत आहे.

जळगावातील शिवराम नगर परिसरातील खडसे यांच्या बंगल्यात झालेल्या घरफोडीनंतर चोरीचा तपास हाती घेतलेल्या जळगाव पोलिसांना तांत्रिक पुरावे आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे या घटनेचे सूत्रधार उल्हासनगरातील असल्याचे निष्पन्न झाले होते. विशेष पथक उल्हासनगरात दाखल झाले आणि विठ्ठलवाडी पोलिसांसोबत संयुक्त मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेत उघड झाले की, चोरीनंतर आरोपींनी घरातील सोने-चांदीचे दागिने उल्हासनगरात चिराग सय्यद या व्यक्तीकडे सुपूर्द केले होते.

मोठी बातमी! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर; दुबार मतदान रोखण्यासाठीही आणलं खास 'टूल'

सातारा जिल्ह्यातील 'राधा' म्हशीचा जगात डंका; सर्वात बुटकी म्हैस म्हणून 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद

ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला गती; देशातील सर्वात लांब शहरी बोगदा

कोइंबतूर विमानतळाजवळ गँगरेप प्रकरण; पोलिसांवर हल्ला करून पळण्याचा प्रयत्न करणारे तिघे अटकेत

डॉ. संपदा मुंडे मृत्यू प्रकरण : बेटी पढ़ी, पर बची नहीं... डॉक्टरांचे काम बंद आंदोलन; अधिकाऱ्यांचाही इशारा