महाराष्ट्र

एकनाथ खडसे यांचा मुख्यमंत्र्याशी भावनिक संवाद ; आभार मानत म्हणाले,"...तर माझं विमान लँड झालं नसतं. "

नवशक्ती Web Desk

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना छातीत दुखू लागल्याने मुख्यमंत्री एकनात शिंदे यांनी त्यांच्यासाठी तातडीने एअर अँब्युलन्सची व्यवस्था केली. एकनाथ खडसे यांच्या प्रकृतीची माहिती मुख्यमंत्र्यांना मिळताच त्यांनी फोन फिरवून तातडीने आवश्यक ती व्यवस्था केली. आता एकनाथ यांच्या प्रकृतीती सुधारणा झाली आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करत जी मदत केली त्याबद्दल आभार मानले आहेत.

माजी मंत्री एकनाथ खडसे यांची प्रकृती बिघडली तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या सातारा जिल्ह्यातील दरेगावात होते. मुख्यमंत्री आपल्या शेतात काम करत होते. यावेळी त्यांना एकनात खडसेंना हृदयविकाराचा धक्का त्रास होऊ लागल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एअर अँब्युलन्सची व्यवस्था केली. एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसेंनी मुख्यमंत्र्यांशी संपर्क केला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने एअर अँब्युलन्सची व्यवस्था केली होती. याबाबत एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्र्याचे आभार मानत त्यांच्याशी फोनवरुन भावनिक संवाद साधला आहे.

मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना एकनाथ खडसे म्हणाले की, आपला छोटाचं विषय होता. आपल्या दृष्टीकोणातून बहूदा फात मोठाही नव्हता. मला एअर अँब्युलन्सच मिळत नव्हती. एक मिळाली ती नाशिकला उभीही होती. मात्र, एटीसी क्लिअरन्स मिळत नव्हता. तुम्ही बोलल्यामुळे मिळालं मी रुग्णालयात आलो. मला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं तेव्हा अँजिओप्लास्टीचा निर्णय घेतला. दोन ब्लॉकेज १०० आणि तिसरा ७० टक्के होता. परिस्थिती गंभीर होती. पण त्यांनी अँजिओप्लास्टी केली. ती व्यवस्थित पार पडली. कार्डिअॅक्ट अरेस्ट आला माझं हृदय १०० टक्के बंद पडलं. त्यावेळी दोन मिनिटांची शॉक ट्रिटमेंट दिली. तुमचं विमान विमान वेळेवर आलं नसतं तर माझं विमान टेक ऑफ झालं असतं आणि लँड झालंच नसतं. असं एकनाथ खडसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना म्हणाले आहेत. यावेळी खडसे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस