महाराष्ट्र

पराभव दिसायला लागला की अनेकांचे दशावतार सुरू होतात! एकनाथ शिंदे यांचा भाजपवर अप्रत्यक्ष प्रहार

पराभव दिसायला लागला की अनेकांचे दशावतार सुरू होतात, अशा शब्दांत शिंदे सेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी मालवण येथे भाजपचे नाव न घेता टोला लगावला. मालवण नगरपरिषदेच्या निवडणूक प्रचारासाठी ते सायंकाळी मालवणात आले होते.

Swapnil S

मालवण : पराभव दिसायला लागला की अनेकांचे दशावतार सुरू होतात, अशा शब्दांत शिंदे सेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी मालवण येथे भाजपचे नाव न घेता टोला लगावला. मालवण नगरपरिषदेच्या निवडणूक प्रचारासाठी ते सायंकाळी मालवणात आले होते.

अर्ध्या तासाच्या भाषणात शिंदे यांनी आमदार निलेश राणे यांच्या कार्यशैलीचे जोरदार कौतुक केले. निलेशला त्याचे वडील नारायण राणे या तडफदार नेत्याचे बाळकडू लाभले आहे, असे सांगत त्यांनी जुन्या आठवणी जागवल्या आणि नारायण राणे यांच्याही नेतृत्वाचे गौरवोद्गार काढले. इलाका किसका भी हो… धमाका निलेश राणे ही करेगा, असे म्हणत शिंदे यांनी मालवणच्या मतदारांना आमदार राणे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले.

मालवण नगरपरिषद सेनेच्या हाती देऊन विकासाचा झेंडा फडकवण्याची विनंतीही त्यांनी केली. ऐतिहासिक आणि निसर्गरम्य मालवणचे भविष्य उज्ज्वल करायचे असेल, तर निलेश राणेंना साथ द्या. मी स्वतः त्यांच्या पाठीशी कायम खंबीर उभा राहीन.

कार्यक्रमात शिंदे सेनेचे सिंधुदुर्ग संपर्कमंत्री उदय सामंत, आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचीही भाषणे झाली.सभेनंतर ओरोस येथे उबाठा विभागातील अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे सेनेत जाहीर प्रवेश केला.

लाडकी बहीण योजनासह महिलांसाठी नवे उपक्रम

आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातील विकासकामांचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले की, लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचा विरोधकांचा प्रचार खोटा आहे. ही योजना आम्ही कधीही बंद पडू देणार नाही. महिलांना उद्योजकतेकडे वळवून त्या लखपती बनाव्यात, यासाठी आगामी काळात आणखी योजना राबवण्यात येतील. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत महायुतीला मिळालेल्या भरघोस यशाचाही त्यांनी उल्लेख केला. विधानसभेच्या इतिहासात एवढे मोठे यश कधीच मिळाले नव्हते, असे ते म्हणाले.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय : सर्व स्मार्टफोनमध्ये ‘संचार साथी’ ॲप अनिवार्य; सायबर फसवणुकीवर लगाम

"काँटनेवाले अंदर बैठे हैं"; संसदेत श्वान आणणाऱ्या खासदार रेणुका चौधरींचा सरकारवर निशाणा, भाजपकडून कारवाईची मागणी

मुंबईत पुन्हा हाय अलर्ट! २ शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी, पोलीस यंत्रणा ॲक्शन मोडवर

ठाणे ते दक्षिण मुंबई अवघ्या ३० मिनिटांत! MMRDA कडून एलिव्हेटेड ईस्टर्न फ्रीवे एक्स्टेंशनच्या कामाला सुरुवात

'उतावीळ लोकं, उतावीळ कामं'! समांथाने राज निदिमोरूशी 'गुपचूप' केलं लग्न; दिग्दर्शकाच्या पहिल्या पत्नीची पोस्ट चर्चेत