ANI
महाराष्ट्र

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून तर, देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली

अगदी शेवटच्या देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली

वृत्तसंस्था

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर राज्याला पर्यायी सरकार द्यायचे होते, अशावेळी देवेंद्र फडणवीस यांचेच नाव पुढे होते. मात्र अचानक एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री असतील, असे समोर आले. त्यानुसार एकनाथ शिंदे यांनी आज संध्याकाळी ७.३० ला मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अगदी शेवटच्या देवेंद्र फडणवीस यांनीही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

काय म्हणाले जे पी नड्डा ?

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात सामील होणार... ट्विटच्या माध्यमातून नड्डा यांनी सांगितले की, भाजपने महाराष्ट्रातील लोकांच्या भल्यासाठी मोठे मन दाखवत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले, "देवेंद्र फडणवीस यांनीही मंत्रिमंडळात सामील होण्याचा निर्णय मोठ्या मनाने घेतला आहे, यावरून त्यांची महाराष्ट्रातील जनतेशी असलेली ओढ दिसून येते."

अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा परतीचा प्रवास सुरू; आज दुपारी ३ वाजता कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळ उतरणार

द्वेषपूर्ण, आक्षेपार्ह पोस्टसाठी आचारसंहिता तयार करा! सुप्रीम कोर्टाचे केंद्र, राज्यांना निर्देश

मुंबईतील बेकायदा बांधकामांचे वर्गीकरण करा! पाठीशी घालणाऱ्यांवरही कारवाई, उपमुख्यमंत्री शिंदेंचा अधिकाऱ्यांना इशारा

हरयाणा, गोवा, लडाखला मिळाले नवे राज्यपाल

बोइंगच्या विमानांचे ‘फ्यूएल स्वीच’ तपासा; DGCA चे आदेश