डिसेंबरपर्यंत उन्हाचे चटके बसणार! एल निनोची तीव्रता वाढणार, सरासरीपेक्षा अधिक तापमान राहणार 'एआय' ने बनविलेली प्रतिमा
महाराष्ट्र

डिसेंबरपर्यंत उन्हाचे चटके बसणार! एल निनोची तीव्रता वाढणार, सरासरीपेक्षा अधिक तापमान राहणार

राज्यातील निम्म्या प्रदेशातून मोसमी पावसाने माघार घेतल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून बहुतांश भागात कमाल तापमान ३ ते ४ अंशांनी वाढले आहे. येत्या काळात ‘एल निनो’ स्थितीची तीव्रता हळूहळू वाढत जाणार आहे. त्यामुळे डिसेंबरपर्यंत उन्हाचे चटके सहन करावे लागणार आहेत.

Swapnil S

मुंबई : राज्यातील निम्म्या प्रदेशातून मोसमी पावसाने माघार घेतल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून बहुतांश भागात कमाल तापमान ३ ते ४ अंशांनी वाढले आहे. येत्या काळात ‘एल निनो’ स्थितीची तीव्रता हळूहळू वाढत जाणार आहे. त्यामुळे डिसेंबरपर्यंत उन्हाचे चटके सहन करावे लागणार आहेत.

सप्टेंबरमध्ये एल निनोची तीव्रता ७५ टक्क्यांवर होती, ती ऑक्टोबरमध्ये ९४ टक्के, नोव्हेंबरमध्ये ९७ टक्के आणि डिसेंबरमध्ये ९६ टक्के इतकी असेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी वर्तवला आहे. एल निनो जानेवारी २०२७ मध्ये पुन्हा ७५ टक्क्यांवर जाईल. त्यामुळे पुढील तीन महिने देशभरातील नागरिकांसाठी खडतर असणार आहेत.

सध्या ‘ऑक्टोबर हिट’चे चटके बसण्यास वाढ झाली असून कोकण प्रदेशात उष्ण आणि दमट वातावरणामुळे नागरिकांना उन्हाच्या झळांचा सामना करावा लागत आहे. हवामान विभागाच्या दीर्घकालीन अंदाजानुसार, ऑक्टोबर महिन्यात संपूर्ण देशात कमाल तापमान सरासरीहून अधिक राहील, अशी शक्यता व्यक्त केली असून त्यामुळे राज्यातही ऑक्टोबर तापदायक ठरण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, प्रशांत महासागरतील ‘एल निनो’ स्थिती ऑक्टोबरपासून अधिक तीव्र होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे यंदाच्या हिवाळ्यातही ‘एल निनो’ स्थितीचा प्रभाव जाणवेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात सरासरीहून २ ते ३ अंश अधिक कमाल तापमान नोंदले जात आहे. पुढील चार दिवसात राज्यातील कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होईल तर पुढील तीन दिवस कोकण प्रदेशातील कमाल तापमान ३५ ते ३७ अंशांच्या दरम्यान राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

ज्ञानेश कुमार यांच्यावरील याचिकांवर आज सुनावणी

ज्ञानेशांविरोधात 'गर्जना'; सर्वपक्षीय मोर्च्यात राज्यातील SIR रद्द करण्याची मागणी

नागरिकांचे मत काढून घेणारी प्रक्रिया मनमानी; सर्वोच्च न्यायालयाचे न्या. उज्ज्वल भुयान यांची चपराक

GST अधिकाऱ्यांवर आता लागणार लगाम; जीएसटी अंमलबजावणीत व्यापक सुधारणा होणार

महिला डॉक्टर मारहाण प्रकरण : रमेश म्हात्रेसह चार जणांची रवानगी तुरुंगात