महाराष्ट्र

समृद्धीवर अपघातात उद्योजकाचा मृत्यू

समृद्धी महामार्गावर इगतपुरी बोगद्याच्या पुढे वेगवान कारचा अपघात झाला. या अपघातात कारने तीनवेळा पलटी मारली. या अपघातात उद्योजक सुनील हेकरे यांचा अपघातात मृत्यू झाला असून, त्यांची पत्नी व दोन मुले गंभीर जखमी झाली आहेत. अपघातग्रस्तांना तत्काळ वैद्यकीय मदत न मिळाल्यामुळे हेकरे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.

Swapnil S

नाशिक : समृद्धी महामार्गावर इगतपुरी बोगद्याच्या पुढे वेगवान कारचा अपघात झाला. या अपघातात कारने तीनवेळा पलटी मारली. या अपघातात उद्योजक सुनील हेकरे यांचा अपघातात मृत्यू झाला असून, त्यांची पत्नी व दोन मुले गंभीर जखमी झाली आहेत. अपघातग्रस्तांना तत्काळ वैद्यकीय मदत न मिळाल्यामुळे हेकरे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. सुनील हेकरे आणि त्यांचे कुटुंबीय मुंबईहून नाशिककडे आलिशान कारमधून प्रवास करत होते. मात्र, समृद्धी महामार्गावर शहापूर हद्दीत त्यांच्या कारला अपघात झाला. त्यामध्ये उद्योजक सुनील हेकरे हे कारमधून बाहेर फेकले गेले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने आणि प्रचंड रक्तस्रावामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

मृत सुनील हेकरे यांचे बंधू अनिल हेकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर अपघाताच्या ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे गाडीचा ताबा सुटून अपघात झाला. "महामार्गावरील बांधकामाची गुणवत्ता निकृष्ट असून, अपघातानंतर वेळेवर वैद्यकीय मदत मिळाली नाही," असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

"भगवा आणि हिंदुत्वाचा विजय"; मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष ठरल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांना अश्रू अनावर

2008 Malegaon Blast : 'दंगलींचे शहर' बॉम्बस्फोटाने काळवंडले! मालेगावच्या इतिहासातील काळा दिवस

"भारत-रशियाने मिळून त्यांची आधीच डबघाईस आलेली अर्थव्यवस्था..."; टॅरिफच्या तडाख्यानंतर ट्रम्प यांचा थेट निशाणा

2008 Malegaon Blast : ठोस पुरावेच नाही! साध्वी प्रज्ञा, पुरोहित यांच्यासह सातही आरोपी निर्दोष, १७ वर्षांनंतर आला निकाल

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’