@ANI
महाराष्ट्र

निवडणूक कामातून अतिआवश्यक कर्मचाऱ्यांना वगळणार, रुग्ण व शववाहिका कर्मचाऱ्यांना दिलासा; सांस्कृतिक मंत्र्यांची माहिती

लोकसभा निवडणुकीत महापालिकेतील अतिआवश्यक सेवेत मोडणाऱ्या रुग्णवाहिका, शववाहिनीवरील कर्मचाऱ्यांना निवडणूक कामांसाठी नेमण्यात आले होते; मात्र, आगामी विधानसभा तसेच महापालिका निवडणुकीतून रुग्णवाहिका, शववाहिनीवरील कर्मचाऱ्यांना निवडणूक कामातून वगळण्यात येईल.

Swapnil S

मुंबई : लोकसभा निवडणुकीत महापालिकेतील अतिआवश्यक सेवेत मोडणाऱ्या रुग्णवाहिका, शववाहिनीवरील कर्मचाऱ्यांना निवडणूक कामांसाठी नेमण्यात आले होते; मात्र, आगामी विधानसभा तसेच महापालिका निवडणुकीतून रुग्णवाहिका, शववाहिनीवरील कर्मचाऱ्यांना निवडणूक कामातून वगळण्यात येईल. त्याऐवजी इतर व्यवस्था करून देण्यात येईल, अशी माहिती सांस्कृतिक मंत्र्यांनी विधान परिषदेत दिली.

केईएम रुग्णालयामधील शववाहिनीवरील चालकाला निवडणूक कामासाठी नेमण्यात आले होते. ही शववाहिनी बंद होती. त्याचा गैरफायदा खासगी शववाहिका चालकांनी घेतला आणि मृतांच्या नातेवाईकांची लूटमार केली. त्याचबरोबर केईएम तसेच पालिका रुग्णालयातील यानगृहातील रिक्त पदे तातडीने भरा, महापालिकेतील अतितातडीच्या सेवा विभागातील कर्मचाऱ्यांना विधानसभा, महापालिका निवडणुकीच्या कामात जुंपू नका, अशी विशेष उल्लेख सूचना विलास पोतनीस यांनी मांडली होती. त्यावर सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिले.

यानगृहातील रिक्त पदेही भरणार

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, यानगृहातील रिक्त पदेही आचारसंहिता लागण्याआधी तातडीने भरण्याच्या सूचना मुंबई महापालिकेला केल्या जातील, असेही सांस्कृतिक मंत्र्यांनी स्पष्ट केले.

Nirmala Sitharaman : GST कपातीचे फायदे ग्राहकांपर्यंत पोहचले

'तो' GR रद्द करण्याची जबाबदारी आता भुजबळांची; विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांचा हल्लाबोल

'ती' नावे तात्पुरती चिन्हांकित करणार; दुबार मतदारांबाबत राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण मागितले

पुनर्विकास प्रकल्पास उपनिबंधकाचे 'ना-हरकत प्रमाणपत्र' अनावश्यक; ७९ (अ) अंतर्गत मुरलेल्या भ्रष्टाचाराला उच्च न्यायालयाचा सुरुंग

औरंगाबाद रेल्वे स्टेशन आता 'छत्रपती संभाजीनगर'